Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडायची? पाहा व्हिडिओ-साडी खराब होणार नाही

पावसाळ्यात साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडायची? पाहा व्हिडिओ-साडी खराब होणार नाही

Styling Tips Viral Video : इंस्टाग्रामवर  साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडावी याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 11:45 AM2024-06-17T11:45:42+5:302024-06-17T17:15:52+5:30

Styling Tips Viral Video : इंस्टाग्रामवर  साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडावी याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Styling Tips Viral Video : How to hold an umbrella after wearing a saree Watch the Viral video | पावसाळ्यात साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडायची? पाहा व्हिडिओ-साडी खराब होणार नाही

पावसाळ्यात साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडायची? पाहा व्हिडिओ-साडी खराब होणार नाही

पावसाळ्याच्या (Monsoon)दिवसांत चांगले कपडे कपडे घालणंच नको वाटतं. कारण कितीही उत्साहात ड्रेसिंग केलं तरी पावसाळ्यात चिखलामुळे कपडे खराब होतात. (Viral Video) चालताना पायांवर चिखल उडतो तर कधी वाहनांच्या  वेगामुळे अंगावरसुद्धा पाणी उडतं. सणाच्या दिवशी किंवा कोणताही कार्यक्रम असेल तेव्हा महिला साडी नेसणं पसंत करतात पण पावसाळ्यात महागड्या साड्या खराब होण्याच्या भितीने महिला चांगल्या  साड्या नेसणं टाळतात. (How to hold an umbrella after wearing a saree)

साडी नेसून बाहेर जाताना पावसामुळे साड्या खराब होऊ नयेत किंवा चालताना अडथळे येऊ नयेत यासाठी चालण्याची आणि छत्री पकडण्याची व्यवस्थित ट्रिक माहित असावी लागते. इंस्टाग्रामवर  साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडावी याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिला साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडायची याची व्यवस्थित माहिती देत आहे.

सगळ्यात आधी छत्रीचं बटन प्रेस करून छत्री ओपन करा. त्यानंतर साडीच्या पदराचा एक कॉर्नर घ्या आणि पुढे पदराला व्यवस्थित खोचा. त्यानंतर साडीच्या निऱ्या एकाने धरून व्यवस्थित चाला. या पद्धतीने तुम्ही चाललात तर छत्री धरून अगदी  सहज बॅगसहीत चालता येतं. भाजी घेण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. 

नव्या ट्रेंडप्रमाणे साडी कशी नेसावी (How To Wear Saree Perfectly)

१) पावसाळ्यात तुम्ही ऑगेंजा किंवा शिफॉन, जॉर्जेटच्या साड्या नेसू शकता. जड सिल्कच्या साड्या पावसाळ्यात नेसणं टाळा. साडीला कमीत कमी निऱ्या असतील याची काळजी घ्या,  बाहेर जाताना किंवा घरात  साडी नेसून काम करताना पदर मोठा ठेवून तो कमरेला खोचा किंवा मोकळा सोडलेला पदर खांद्यावर  घ्या. 

२) साडी व्यवस्थित पीनअप करा. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जास्त पीन्स लावायच्या आहेत. कमीत कमी पिन्स लावून तुम्ही चांगली साडी नेसू शकता. साडी सैलसर नेसू  नका.  कारण सैल साडीचा लूक व्यवस्थित येत नाही आणि साडी खाली खाली येऊ लागते. शरीराचा आकारही बेढब दिसतो. 

काळे कमी पांढरे केसच जास्त दिसतात? आहारतज्ज्ञ सांगतात जेवणात 'हे' पदार्थ खा; काळेभोर होतील केस

३) दिवसभर साडी नेसणार असाल तर चालण्या फिरण्यातही अडथळे येऊ शकतात. साडीचा लूक चांगला दिसावा यासाठी तुम्ही साडीच्या आत पेटीकोट कोणता घालता हे सुद्धा महत्वाचे असते. पेटिकोट हा व्यवस्थित फिटिंगचा असावा.  ज्यामुळे तुम्हाला फिट, सेक्सी लूक मिळेल.

ओटी पोटी थुलथुलीत-कंबर जाड दिसते? सकाळी १ ग्लास बडीशेपेचं पाणी प्या, झरझर उतरेल चरबी

४) तुम्हाला साडी नेसण्याची फार सवय नसेल तर तुम्ही फ्लेअर्ड पेटिकोटी घालू शकता. पेटीकोटसाठी लिजी बीजी फॅब्रिक छान दिसतात. त्यामुळे चालताना तुमचा पाय साडीत अडकत नाही आणि आरामदायक वाटेल.

Web Title: Styling Tips Viral Video : How to hold an umbrella after wearing a saree Watch the Viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.