Lokmat Sakhi >Social Viral > सुहाना शाहरुख खानची लावणी स्टाइल डिझायनर साडी, पण लोक का तिला नावे ठेवत आहेत?

सुहाना शाहरुख खानची लावणी स्टाइल डिझायनर साडी, पण लोक का तिला नावे ठेवत आहेत?

Suhana Khan's Lavni Saree: दिवाळी पार्टीत सुहाना खानने जी साडी नेसली होती, त्यामुळे ती जबरदस्त ट्रोल होत आहे. लावणी स्टाईल साडीचा बघा हा कोणता नवा प्रकार आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 04:47 PM2022-10-21T16:47:43+5:302022-10-21T16:48:50+5:30

Suhana Khan's Lavni Saree: दिवाळी पार्टीत सुहाना खानने जी साडी नेसली होती, त्यामुळे ती जबरदस्त ट्रोल होत आहे. लावणी स्टाईल साडीचा बघा हा कोणता नवा प्रकार आहे..

Suhana Khan wore Lavni pattern saree, Why she is getting trolled? Have you seen Suhana Khan's lavni saree? | सुहाना शाहरुख खानची लावणी स्टाइल डिझायनर साडी, पण लोक का तिला नावे ठेवत आहेत?

सुहाना शाहरुख खानची लावणी स्टाइल डिझायनर साडी, पण लोक का तिला नावे ठेवत आहेत?

Highlightsका कोण जाणे सुहाना या साडीत खूपच जास्त अन्कम्फर्टेबल होती. ती गाडीतून उतरली आणि चालायला लागली, तेव्हाच ती खूप अवघडल्यासारखी वाटत होती.

सेलिब्रिटींच्या दिवाळी सेलिब्रेशन (diwali celebration) पार्ट्यांना सध्या एकदमच उधाण आले आहे. दोन- तीन दिवसांपुर्वी अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनीही एक अशीच जंगी पार्टी दिली होती. आता नुकतीच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी होस्ट केलेली पार्टीही दणक्यात पार पडली. अभिनेत्री माधुरी दिक्षितपासून ते शाहरुख खान- गौरी खानची लेक सुहाना खानपर्यंत (Shahrukh Khan's daughter Suhana Khan getting trolled) अनेक सेलिब्रिटींची या पार्टीला उपस्थिती होती. याच पार्टीत सुहाना मात्र तिच्या साडीमुळे जबरदस्त ट्रोल झाली.

 

सुहानाची साडी खरेतर अतिशय सुंदर होती. मोतिया- आयव्हरी रंगाच्या या साडीवर सिल्व्हर थ्रेडने एम्ब्रॉयडरी केलेली होती. तसेच संपूर्ण साडीवर सिक्विन वर्कही होते. पण का कोण जाणे सुहाना या साडीत खूपच जास्त अन्कम्फर्टेबल होती.

ऋतिक रोशन खातो त्या हेल्दी पिझ्झाची रेसिपी, ऋतिक म्हणतो, चव इतकी भारी की..

ती गाडीतून उतरली आणि चालायला लागली, तेव्हाच ती खूप अवघडल्यासारखी वाटत होती. हे अवघडलेपण तिच्या साडीमुळे आले आहे की तिच्या हाय हिल्समुळे हे काही चटकन लक्षात येत नाही. समोरून बघताना तिच्या साडीमध्ये काही खटकतही नाही.

 

पण जेव्हा आपण तिला त्या लूकमध्ये पाठमोरे बघतो, तेव्हा मात्र तिची साडी मागच्या बाजूने खूपच वेगळी जाणवते. साधारणपणे नऊवारी साडी नेसल्यावर मागच्या बाजूने जसा काष्टा दिसतो, तसा सुहानाच्या साडीचा दिसत होता.

दिवाळीची साफसफाई, तळणं यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात ४ उपाय

पण तो काष्टा म्हणजे तिने डाव्या खांद्यावरून जो पदर मागे सोडला होता, त्याच पदराचा काही भाग उचलून तिच्या कंबरेवर खोचण्यात आला होता. तिच्या या साडीचा लावणी साडी म्हणूनही काही ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे, पण काही जणांना तिचा तो पदर मागच्या बाजूने अडकला असावा, असंही वाटत आहे. साडीच्या बाबतीत नेमका काय घोळ झाला ते माहिती नाही, पण सुहाना मात्र त्यामुळे खूपच अवघडून गेलेली होती, हे मात्र नक्की. 
 

Web Title: Suhana Khan wore Lavni pattern saree, Why she is getting trolled? Have you seen Suhana Khan's lavni saree?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.