वाढत्या उन्हामुळे देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये एसी, फ्रिज कंप्रेंसर फुटण्याच्या घटना समोर येत आहे. एसी किंवा कार जास्त उन्हात उभी केल्यास शॉर्ट सर्किटचा धोका वाढत आहे. अशा स्थितीत सावधगिरी बाळगून तुम्ही वाढत्या अपघाताच्या घटना टाळू शकता. (Home Hacks) एसी- फ्रिज उन्हाळ्यात तांसंतास सुुरु असतात. त्यात बिघाड असेल, ते तापत असतील तर त्याचा स्फोट होण्याच्या काही घटना आहेत. याशिवाय वायरींग दुरूस्त ठेवण्याबरोबर फ्रिजचे कंप्रेसरही चेक करा. एसीचे फिल्टरचे साफ, स्वच्छ ठेवा.. (How to prevent AC, fridge, and other appliances from extreme heat)
विज सुरक्षा नियाम आरोगाचे सदस्य आलोक शुल्का यांचे म्हणणे आहे की एसी ब्लास्ट होणं सामान्य नाही. यापासून बचाव करण्यासाठी चांगली वायरींग असणं फार महत्वाचे असते. वीजेच्या लोडनुसार व्हायरींग करणं गरजेचं आहे. हे योग्य पद्धतीनं न झाल्यास लोड शेडींगची समस्या उद्भवते आणि शॉर्ट सक्रिट होते. शॉर्ट सर्किटची ठिणगी एसीपर्यंत पोहोचल्याने विस्फोट होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात लोक सकाळपासून रात्रीपर्यत एसी लावून ठेवतात. तासनतास या उपकरणांचा वापर केल्यामुळे एसी ओव्हरलोड होते. यामुळे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स गरम होतात आणि स्फोट होण्याचं कारण ठरू शकतात. एअर फिल्टर साफ ठेवा. यामुळे लाईफसुद्धा दीर्घकाळ वाढते, एसीचे आऊटडोर नेहमी उघडे ठेवा, वादळ-वारा आल्यानंतर एसी अनप्लग करा.
शॉट सर्किटपासून बचाव करण्यासाठी वीजेच्या तारांची पाहणी करा. आऊटडोअर युनिट अशा ठिकाणी ठेवा जिथे जास्त ऊन येणार नाही. वेळोवेळी एसीचा मेंन्टेनस करत राहा. टेक्निशियन संजय सोनी सांगतात की फ्रिज अशा ठिकाणी सेट करा जिथे विजेचा प्रवाह व्यवस्थि येईल. अशा स्थिती फ्रिजच्या कंप्रेशरवर दबाव कमी येतो. याव्यतिरिक्त फ्रिजसाठी पॉवर प्लगचा वापर करा.
अशी घ्या काळजी
1) फ्रिजमध्ये जास्त बर्फ जमा होणार याची काळजी घ्या आणि टेम्परेचर कमी करा. कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर कंप्रेसर नक्कीच चेक करा. सर्विसिंगदरम्यान लोकल पार्ट्स लावू नका. चांगल्या क्वालिटीचे पार्ट्स लावा. आग लागण्याचं सगळ्यात मोठं कारण शॉर्ट सर्किट असू शकते.
प्रोटीनसाठी महागड्या गोेष्टी परवडत नाहीत? फक्त १० रुपयांत खा ३ प्रोटीन पदार्थ- हाडं होतील बळकट
2) शॉर्ट सर्किटमध्ये हलके हलके स्पार्किंग होते. जास्त ऊन असेल तर स्पार्किंग आगीचे रूप घेते. ही समस्या पेट्रोलच्या गाड्यांमध्ये जास्त उद्भवते. या गाड्यांमध्ये पाईप जास्त लूज होतात आणि पाईपमधून पेट्रोल बाहेर येणं सुरू होतं.
रोज त्याच त्या भाज्या नको वाटतात? ५ मिनिटांत करा आंबट-गोड टॉमॅटोची चटणी, तोंडाला येईल चव
3) जर गाडी उन्हात उभी असेल तर आतल्या वायरींगची तपासणी करून घ्या. गाडीत स्पार्किंग होत असेल तर त्वरीत दुरूस्त करून घ्या. गाडी चालवताना पेट्रोल किंवा डिजेलचा वासस येत असेल तर तेलाच्या पाईपची तपासणी करा. इंजिनमधील तेल आणि कुलेंटची नेहमी काळजी घ्या.