Join us

Sunny Leone Basketball Video : चक्क साडीवर बास्केट बॉल खेळताना झळकली सनी लिओनी; पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:45 IST

Sunny Leone Basketball Video : सनी ग्लॅमर इंडस्ट्रीचा एक भाग असली तरी तिला खेळाची खूप आवड आहे. तिला आईस स्केटिंग, हॉकी सारखे खेळ देखील आवडतात. लहानपणी सनी अनेकदा मुलांसोबत हॉकी खेळत असे.

सनी लिओन (Sunny Leone) फुटबॉलमध्ये पारंगत आहे, हे आपण सर्वांनी याआधी पाहिले आहे, पण ती साडीतही उत्तम बास्केटबॉल खेळते, त्याची झलक समोर आली आहे. सनी लिओनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला शाहरुख खान आणि काजोलच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील सीन नक्कीच आठवेल.( Sunny leone playing basketball with her husband in red saree watch video)

या व्हिडिओमध्ये सनी (Daniel Weber) पती डॅनियल वेबरसोबत बास्केटबॉल खेळत आहे. या व्हिडिओमध्ये सनी साडी नेसून उंच उडी मारताना दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर शाहरुख आणि काजोलचे 'ये लड़का है' हे गाणेही ऐकू येत आहे. याआधीही सनी लिओनीने फुटबॉल खेळतानाचे व्हिडिओ शेअर केले होते. 

केस दिवसेंदिवस जास्तच पांढरे होत चाललेत? स्वयंपाकघरातील ३ उपाय,काळेभोर केस राहतील कायम

सनी ग्लॅमर इंडस्ट्रीचा एक भाग असली तरी तिला खेळाची खूप आवड आहे. तिला आईस स्केटिंग, हॉकी सारखे खेळ देखील आवडतात. लहानपणी सनी अनेकदा मुलांसोबत हॉकी खेळत असे. सनी लिओनी असा व्हिडिओ पाहून अनेकजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :सनी लिओनीसोशल व्हायरलबास्केटबॉल