शाळेनंतर कोणतीही परीक्षा देताना आपल्याकडे हॉल तिकीट असणे आवश्यक असते. या हॉल तिकीटशिवाय आपण परीक्षेला बसू शकत नाही. हॉल तिकीटवर असणारी माहिती योग्य असावी यासाठी आपण ते भरताना वारंवार तपासतो. तरी काही वेळा त्यामध्ये नावाच्या शुद्धलेखनाच्या किंवा अन्य काही चुका राहतातच. आता इथपर्यंत ठिक आहे. पण आपल्या हॉल तिकीटवर असणाऱ्या फोटोच्या जागी तरी आपलाच फोटो हवा ना. म्हणजे संबंधित परीक्षा आपणच देत असल्याची वर्गात असणाऱ्या सुपरवायजरला खात्री पटते. मात्र नुकताच एक भन्नाट किस्सा घडला, जे पाहून विद्यार्थीही चकीत झाला (Sunny Leone Photo Printed on the Admit Card of Student Shocked After Watching Viral Photo).
ಶಿಕ್ಷಕರ ನೇಮಕಾತಿಯ ಪ್ರವೇಶಾತಿ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಯ ಬದಲು ನೀಲಿಚಿತ್ರ ತಾರೆಯ ಫೋಟೋ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗಿದೆ.
— B.R.Naidu ಬಿ.ಆರ್.ನಾಯ್ಡು Vasanthnagar (@brnaidu1978) November 8, 2022
ಸದನದಲ್ಲಿ ನೀಲಿಚಿತ್ರ ವೀಕ್ಷಿಸುವ ಪಕ್ಷದವರಿಂದ ಇನ್ನೇನು ತಾನೇ ನಿರೀಕ್ಷಿಸಲು ಸಾಧ್ಯ?@BCNagesh_bjp ಅವರೇ, ನೀಲಿಚಿತ್ರ ತಾರೆ ನೋಡುವ ಹಂಬಲವಿದ್ದರೆ ಒಂದು ಫೋಟೋ ನೇತಾಕಿಕೊಳ್ಳಿ, ಅದಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಬೇಡಿ! pic.twitter.com/Czb7W0d1xJ
एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवर फोटोच्या जागी चक्क दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचा नाही तर अभिनेत्री आणि माजी पॉर्न स्टार सनी लिओनीचा फोटो छापून आला. हा फोटो पाहून विद्यार्थ्याला आश्चर्याचा धक्का बसला. कर्नाटकमध्ये शिक्षक भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला. या व्यक्तीने कर्नाटक राज्याच्या शैक्षणिक विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक परीक्षा पात्रतेसाठी अर्ज केला होता. या अर्जामध्ये फोटोच्या जागी या व्यक्तीचा फोटो छापून येण्याऐवजी चक्क सनी लिओनीचा फोटो छापून आला. या हॉल तिकीटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून सोशल मीडियावर राजकीय नेत्यांनी त्याबाबत ट्विटस केले आहेत. मात्र यामध्ये विद्यार्थ्याची तांत्रिक चूक असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्याकडून फोटो सिलेक्ट करताना ही चूक झाली असल्याने त्यामध्ये शिक्षण विभागाची चूक नाही असेही या आरोपांचा सामना करताना संबंधितांनी नमूद केले आहे. मात्र शिक्षण विभागाने यामध्ये योग्यरितीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे मत सोशल मीडियावर नेटीझन्सकडून व्यक्त करण्यात आले आहे. ही परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती, ज्यासाठी ३,३२,९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. कर्नाटकातील एकूण ७८१ केंद्रावर ही परीक्षा झाली.