Join us  

करिनासोबत व्यायाम करतोय तिचा छोटा मुलगा जेह.. बघा दोघांचा सुपरक्यूट व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 12:58 PM

Kareena Kapoor and Her Son Jeh Doing Exercise: करिनाचं फिटनेस प्रेम तर आपल्याला माहितीच आहे. आता बघा तिच्या तालमीत व्यायाम करण्यासाठी कसा तयार होतोय तिचा छोटा मुलगा जहांगीर म्हणजेच जेह..

ठळक मुद्देकरिनाचा आणि तिच्या चिमुकल्याचा हा सुपरक्यूट व्हिडिओ एकदा बघाच. 

आई कोणतंही काम करत असली की तिच्या मध्येमध्ये करणं, ती करत असलेलं काम स्वत:ही करण्याचा प्रयत्न करणं, असे उद्योग छोट्या मुलांचे चालूच असतात. मुलांचं असं करणं त्यांची आईही बऱ्यापैकी एन्जॉय करत असते. आई असणाऱ्या प्रत्येकीला याचा अनुभव येतोच. हाच अनुभव सध्या घेत आहे अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor). अभिनेत्री असली, मोठी सेलिब्रिटी असली तरी मातृत्वाच्या या आनंदापासून ती स्वत:ला वेगळं ठेवूच शकत नाही. तिचा आणि तिच्या छोट्या मुलाचा म्हणजेच जेह (Kareena Kapoor's son Jeh) चा असाच एक अतिशय सुरेख व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

 

करिनाची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने हा क्यूट व्हिडिओ शूट केला आहे. आता करिना कपूर तिच्या फिटनेसबाबत, रोजच्या वर्कआऊटबाबत किती काटेकोर आहे, हे तर आपण जाणतोच.

सर्दी- खोकल्यावर उत्तम घरगुती उपाय, आलं- गूळ घातलेली गुणकारी गोळी, बघा कशी करायची

त्याचप्रमाणे ती तिचं वर्कआऊट करत होती. ती बहुतेक सुर्यनमस्कार घालत असावी असं ती जो काही व्यायाम करतेय, त्यावरून दिसून येतं. तिचा व्यायाम एकदम रंगात आलेला असताना तिचा छोटा मुलगा जेह रांगत रांगत येतो आणि तिच्या बरोबर खाली येऊन ती जी पोझिशन करते आहे, तीच करण्याचा प्रयत्न करतो.

 

जेहला अशा पद्धतीने मध्येच आलेलं पाहून करिनाही चांगलीच बावरली. पण मग नंतर तिलाही त्याच्या बाललीला पाहून त्याचं कौतूक वाटलं.

लोकरीच्या कपड्यावर बुंदके आले? करा ४ उपाय, कपडे दिसतील नव्यासारखे फ्रेश

जेह तर त्याच्या आईचं अशा पद्धतीने व्यायाम करणं, चांगलंच एन्जॉय करत होता, हे त्याच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसून येतं. करिनाचा आणि तिच्या चिमुकल्याचा हा सुपरक्यूट व्हिडिओ एकदा बघाच. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकरिना कपूरफिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे