Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाकासाठी हौशीने आणलेले प्लास्टिकचे चमचे - ब्रश धुण्याची १ सोपी युक्ती, तेलकट वास - चिकटपणा होईल गायब...

स्वयंपाकासाठी हौशीने आणलेले प्लास्टिकचे चमचे - ब्रश धुण्याची १ सोपी युक्ती, तेलकट वास - चिकटपणा होईल गायब...

Super Easy Way to Clean Silicone Oil Brush & Spatula : सिलिकॉनचे ब्रश,स्पॅचुला आपण आवडीने विकत तर घेतो पण त्यांची स्वच्छता करणे अवघड जाते अशावेळी या सोप्या ट्रिकचा वापर करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2024 01:23 PM2024-07-06T13:23:51+5:302024-07-06T13:38:25+5:30

Super Easy Way to Clean Silicone Oil Brush & Spatula : सिलिकॉनचे ब्रश,स्पॅचुला आपण आवडीने विकत तर घेतो पण त्यांची स्वच्छता करणे अवघड जाते अशावेळी या सोप्या ट्रिकचा वापर करा...

Super Easy Way to Clean Silicone Oil Brush & Spatula How do you clean silicone kitchen brushes & Spatula | स्वयंपाकासाठी हौशीने आणलेले प्लास्टिकचे चमचे - ब्रश धुण्याची १ सोपी युक्ती, तेलकट वास - चिकटपणा होईल गायब...

स्वयंपाकासाठी हौशीने आणलेले प्लास्टिकचे चमचे - ब्रश धुण्याची १ सोपी युक्ती, तेलकट वास - चिकटपणा होईल गायब...

आपल्या किचनमध्ये वेगवेगळ्या मटेरियल पासून तयार झालेली भांडी असतात. काही भांडी स्टील, प्लॅस्टिक, तांबे, पितळ, सिलिकॉन अशा वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवली जातात. आजकाल बाजारांत सिलिकॉन पासून तयार झालेल्या अनेक वस्तू पाहायला मिळतात. सिलिकॉन हे थोडेफार प्लॅस्टिक सारखेच मटेरियल असते. या सिलिकॉन पासून तयार झालेल्या वस्तू अधिक काळ टिकतात. तसेच हे प्लॅस्टिक सारखे दिसत असले तरीही हे फूड ग्रेडेड प्लॅस्टिक असते. त्यामुळे आपण यात अनेक वस्तू ठेवू शकतो(Tips for cleaning oil brushes & Spatula At Home).

सिलिकॉन पासून तयार झालेली अनेक उपकरणे आज बाजारांत उपलब्ध आहेत. त्यापैकी गाळणी स्पॅचुला आणि ब्रशचा आपण अगदी रोजच्या रोज वापर करतो. एखाद्या पदार्थाला तेल किंवा तूप लावण्यासाठी आपण अशा सिलिकॉन ब्रशचा वापर करतो. चमच्याने पदार्थांना तेल लावले की खूप तेल लागते. याउलट अशा सिलिकॉन पासून तयार झालेल्या ब्रशचा वापर केला तर तेलाचे प्रमाण देखील कमी लागते. याचबरोबर सिलिकॉनपासून तयार झालेला स्पॅचुला आपण अनेक पदार्थांना मिक्स (How do you clean silicone kitchen brushes & Spatula ) करण्यासाठी वापरतो. या स्पॅचुलाचा पुढचा भाग हा सिलिकॉनचा (How to clean a silicone brush head) बनलेला असतो. त्यामुळे हा राबरासारखा भाग आपल्याला हवा तसा फोल्ड करता येतो. फनेल, गाळणी, ब्रश, स्पॅचुला या सिलिकॉनच्या अनेक वस्तू रोज वापरात असल्याने त्या खराब होतात. अशा वस्तू वेळच्या वेळी स्वच्छ करणे गरजेचे असते. परंतु या वस्तू नेमक्या कशा स्वच्छ कराव्यात हे अनेकजणांना माहित नसते. त्यामुळे किचनमधील सिलिकॉनपासून तयार झालेल्या  फनेल, गाळणी, ब्रश, स्पॅचुला अशा अनेक वस्तू कशा स्वच्छ करायच्या ते पाहूयात(Super Easy Way to Clean Silicone Oil Brush & Spatula). 

किचनमधील सिलिकॉनच्या वस्तू नेमक्या कशा स्वच्छ कराव्यात ?  

१. सर्वप्रथम एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून डिश वॉश लिक्विड सोप घालावे. 
२. डिश वॉश लिक्विड सोप पाण्यांत पूर्णपणे विरघळवून घ्यावा. 
३. आता या द्रावणांत सिलिकॉन पासून तयार झालेल्या अनेक वस्तू किमान तासभर तरी भिजत ठेवाव्यात. 

काचेच्या बाटल्या स्वच्छ करण्याची १ भन्नाट सोपी ट्रिक, काचेच्या बाटल्या दिसतील नव्यासारख्या लख्ख...

जीन्सवर पडलेत चिखलाचे डाग ? ४ सोपे उपाय, आता पावसाळ्यातही जीन्स घाला बिनधास्त !

४. तासाभरांनंतर या वस्तू त्या द्रावणातून बाहेर काढून डिश वॉश लिक्विड सोप थेट त्या वस्तूंवर लावून घ्यावे. आणि घरातील एखादा जुना ब्रश घेऊन या वस्तू त्या ब्रशने स्क्रब करून घ्याव्यात. 
५. आता या वस्तू स्वच्छ पाण्यांत पुन्हा एकदा धुवून घ्याव्यात. 
६. त्यानंतर कॉटनच्या रुमालाने या वस्तू पुसून संपूर्णपणे वाळवून घ्याव्यात. 

धुतलेली भांडी ठेवण्याची स्टीलची जाळी अस्वच्छ दिसते? १ भन्नाट ट्रिक, जाळी दिसेल नव्यासारखी चकचकीत...

अशाप्रकारे आपण या सिलिकॉनच्या रोजच्या वापरातील वस्तू अगदी सहजरित्या झटपट स्वच्छ करु शकतो.

Web Title: Super Easy Way to Clean Silicone Oil Brush & Spatula How do you clean silicone kitchen brushes & Spatula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.