हिवाळा असो किंवा ऊन्हाळा प्रत्येक वातावरणात सिंलिंग फॅनचा वापर केला जातो. रोज रोज वापरल्यामुळे फॅनवर कार्बनयुक्त धुळीचा मोठा थर तयार होऊ लागतो. (Home Hacks) सिलिंग फॅन घाण झालेला दिसला तरी बरेच लोक फॅन स्वच्छ करण्यााकडे दुर्लक्ष करतात. कारण वेळ काढून स्टूलवर चढून पंखा व्यवस्थित स्वच्छ करायचा म्हटलं की ते किचकट काम वाटतं म्हणून बरेच लोक फॅनची साफसफाई करणं टाळतात. (Super Tricks Home For Cleaning Ceiling Fan at Home) काही सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही सिलिंग फॅन काही मिनिटांत स्वच्छ करू शकता. सिलिंग फॅन स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. (Fan Cleaning Tips)
१) उशीचे कव्हर
सिलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही उशीच्या कव्हरचा वापर करू शकता. पंखा उशीच्या कव्हरने साफ करणं खूपच सोपं आहे. यासाठी उशीचे कव्हर आधी पंख्याने व्यवस्थित झाकून घ्या. दोन्ही हातांनी सरकवत स्वाईप करा. यामुळे पंख्यावरील घाण काही मिनिटांत दूर होईल. याशिवाय धूळ-माती बसणार नाही.
ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल
२) वॅक्यूम क्लिनर
बरेच लोक सोफा आणि कारपेट यांसारख्या वस्तू वॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करतात. सिलिंग फॅन क्लिन करण्यासाठी तुम्ही वॅक्यूम क्लिनरचा वापर करू शकता. कोणत्याही खुर्चीवर उभं राहून वॅक्यूम क्लिनरच्या मदतीने पंखा स्वच्छ करा. यामुळे घाण चुटकीसरशी गायब होईल आणि पंखा एकदम नव्यासारखा चमकेल.
३) सॉक्सचा वापर करा
घरात बरेच जुने मोजे पडलेले असतात. याचा वापर करून तुम्ही पंखा अगदी सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने स्वच्छ करू शकता. यासाठी कॉटनचा पूर्ण साईजचा सॉक्ट ओला करून पिळून घ्या. त्यानंतर मोज्याने पंख्याचे ब्लेड कव्हर करा त्यानंतर स्वाईप करून पंख्याचे पाते स्वच्छ करून घ्या. यामुळे सिलिंग फॅनवर लागलेली धूळ, घाण निघून जाईल.
मुले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुधा मूर्ती सांगतात ८ गोष्टी, पालकांनी एवढे करायला हवेच..
4) सिलिंग फॅन साफ करण्यासाठी सगळ्यात आधी इलेक्ट्रिसिटी ऑफ करा. ज्यामुळे कंरट येण्याचा धोका नसेल. चेहरा कोणत्याही कापडाने कव्हर करा. त्यानंतर पंख्या स्वच्छ करा. यामुळे पंख्यातून कार्बनयुक्त धूळ, माती कमी होईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल,