Lokmat Sakhi >Social Viral > Superfetation : आश्चर्य! एकाच आठवड्यात २ वेळा गर्भवती झाली २५ वर्षीय तरूणी; डॉक्टरांनी रिपोर्ट पाहताच समोर आलं असं काही...

Superfetation : आश्चर्य! एकाच आठवड्यात २ वेळा गर्भवती झाली २५ वर्षीय तरूणी; डॉक्टरांनी रिपोर्ट पाहताच समोर आलं असं काही...

Superfetation already pregnant woman became pregnant : २५ वर्षीय  ओडालिसच्या मते ती आपल्या पहिल्या प्रेग्नंसीचं प्लॅनिग करत होती.  पण तिला नंतर कळलं की आपली दोनवेळा गर्भधारणा झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:16 PM2022-03-03T19:16:21+5:302022-03-03T19:30:24+5:30

Superfetation already pregnant woman became pregnant : २५ वर्षीय  ओडालिसच्या मते ती आपल्या पहिल्या प्रेग्नंसीचं प्लॅनिग करत होती.  पण तिला नंतर कळलं की आपली दोनवेळा गर्भधारणा झाली आहे.

Superfetation already pregnant woman became pregnant again gave birth to twin daughters | Superfetation : आश्चर्य! एकाच आठवड्यात २ वेळा गर्भवती झाली २५ वर्षीय तरूणी; डॉक्टरांनी रिपोर्ट पाहताच समोर आलं असं काही...

Superfetation : आश्चर्य! एकाच आठवड्यात २ वेळा गर्भवती झाली २५ वर्षीय तरूणी; डॉक्टरांनी रिपोर्ट पाहताच समोर आलं असं काही...

गर्भवती महिलेसोबत घडलेली घटना वाचून तुम्हीही चक्रावून झाल. कॅलिफोर्नियात राहत असलेल्या ओडालिस मार्टिनेज महिलेसह  असं काही घडेल याचा तिनं विचारही केला नव्हता. ओडालिसची ५ दिवसात २ वेळा गर्भधारणा झाली. २५ वर्षीय  ओडालिसच्या मते ती आपल्या पहिल्या प्रेग्नंसीचं प्लॅनिग करत होती.  पण तिला नंतर कळलं की आपली दोनवेळा गर्भधारणा झाली आहे.   (superfetation already pregnant woman became pregnant again gave birth to twin daughters)

ओडलिसनं सांगितलं की, आधीपासूनच प्रेग्नंट असतानाही मी पुन्हा प्रेग्नंट झाले. मी दोनवेळा गर्भ कंसिव्ह केला पण ते जुळे नव्हते. या दोघांमध्येही  ५ दिवसांचा गॅप होता. २०२० मध्ये कॅलिफोर्नियाच्या सॅन पाब्लोमध्ये राहत असलेले ओडालिस आणि एंटोनिया मार्टिनेज प्रेग्नंसीची बातमी ऐकून खूप खूश झाले. याआधीही काही महिन्यांपूर्वी त्यांना मिसकॅरेज करावं लागलं होतं. अशा स्थितीत नव्यानं प्रेग्नंसी त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. 

माझं अफेअर होतं, मी बायकोला फसवलं पण तिनं मात्र..’- नवऱ्यानं शेअर केली सोशल मीडियात आपबिती

प्रेग्नंसीदरम्यान ओडालिसनं जेव्हा पहिल्यांदा स्कॅन केले तेव्हा तिला कळलं की तिला २ मुलं होणार आहेत.  एकाच आठवड्यात वेगवेगळ्या दिवशी तिनं ते गर्भ कंसिव्ह केले. या दुर्मिळ स्थितीला सुपरफेटेशन (Superfetation)असं म्हटलं जातं. महिलेची गर्भावस्था एकाचवेळी पुन्हा झाल्यानं ही स्थिती उद्भवते.

 पहिल्या प्रेग्नंसीच्या काही दिवस आधी किंवा नंतर असं होऊ शकतं. ओडालिसनं दोन्ही मुलींचे नाव लिलो आणि इमेल्डा असं ठेवलं आहे. या दोन्ही मुलींचे चेहरे मिळते जुळते आहेत.  ओडालिस सांगते की, आम्ही अनेकदा या दोघांमध्ये गोंधळतो. लोकांना खरं सांगणं टाळून आम्ही या दोघी ट्विन्स आहेत असं सांगतो.

 सुपरफेटेशन म्हणजे काय?

सुपरफेटेशन अशी स्थिती आहे. ज्यात गर्भावस्थेत एक भ्रूण असतानाही नवीन भ्रूण तयार होते. अशा स्थितीत जी महिला आधीपासून गर्भवती आहे ती पुन्हा गर्भधारणा करते. ही स्थिती खूपच दुर्मिळ असते. साधारणपणे एखादी महिला प्रेग्नंट झाल्यानंतर लगेचच दुसरी गर्भधारणा होत नाही. 

Web Title: Superfetation already pregnant woman became pregnant again gave birth to twin daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.