लेखिका मलायका अरोरा.. (Malaika Arora as a auther)असं काही दिवसांतच आपल्याला म्हणावं लागणार आहे. कारण मलायका अरोराचं पुस्तक लेखन सध्या वेगात सुरू असून लवकरच तिचं हे पहिलं वहिलं पुस्तक चाहत्यांच्या भेटीला येत आहे. पुस्तक मलायका लिहिते आहे म्हटल्यावर ते अर्थातच फिटनेस, व्यायाम आणि आहार या ३ मुख्य गोष्टींवर भर देणारं असणार आहे. वयाची पन्नाशी आली तरी मलायका एवढी फिट आणि फाईन कशी हा प्रश्न तिच्या तमाम चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. अर्थात काही फिटनेस सिक्रेट्स शेअर करून मलायका त्याबाबत माहितीही देत असते. पण तेवढ्याने काही समाधान होत नाही. म्हणूनच तर आता तिच्या या पुस्तकातून फिटनेसप्रेमींना भरपूर हेल्थ टिप्स, डाएट टिप्स मिळणार, हे नक्की. (Malaika Arora's book on fitness and nutrition)
मलायका अरोरा फिटनेसबाबत अतिशय आग्रही असते. आणि तिच्याप्रमाणेच तिच्या चाहत्यांनाही रोजच्या रोज फिटनेससाठी काहीतरी केलं पाहिजे, असं तिला वाटतं. त्यामुळेच तर सोशल मिडियाचा वापरही ती फिटनेसविषयक पोस्ट टाकण्यासाठी करताना दिसते. तिचा फिटनेसचा सल्ला फॉलो करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढणारी आहे. म्हणूनच तर मलायकाच्या पुस्तकाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना फिटनेस, हेल्थ, व्यायाम या सगळ्या गोष्टींची बारकाईने माहिती होईल, असे वाटते.
पुस्तकाविषयी बोलताना मलायका म्हणते की, फिटनेस, निराेगी आरोग्य याबाबत अधिकाधिक जागृती करणे, याकडे नेहमीच मी माझा उद्देश म्हणून पाहिले आहे. आता पुस्तकाच्या माध्यमातून मला माझे फिटनेस, आहारविषयक विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. शरीराच्या केवळ एकच भागावर लक्ष केंद्रित करून फिटनेस, आरोग्य मिळत नाही. या गोष्टी मिळविण्यासाठी तुम्हाला अंतबार्ह्य बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तशाच पद्धतीचा प्रयत्न पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आता मलायका तिच्या आवडीच्या विषयावर पुस्तक लिहिते आहे, म्हटल्यावर ते नक्कीच वाचनीय असणार, तसेच त्यातून नक्कीच तिच्या चाहत्यांना आणि इतर फिटनेसप्रेमींना हेल्थ, डाएट, फिटनेस आणि व्यायाम याबाबत सविस्तर माहिती मिळणार, अशी आशा करायला हरकत नाही.