स्त्रिया सोळा शृंगार नेहमी मिरवतात (Social Viral). ज्यात नथीचा देखील समावेश आहे. नथीमुळे महिलेचं अधिक सौंदर्य खुलतं. नथ असो किंवा नोझ पिन. सध्या बाजारात याचे विविध प्रकार उपलब्ध आहे. पण नाजूक नोझ पिनची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण ती आकाराने लहान आणि त्याची पिन छोटी असते. जर ती पिन लूज पडली, तर नाकाद्वारे फुफ्फुसात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली आहे.
कोलकाता येथील एका महिलेवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. कारण श्वासाद्वारे चुकून तिची नोझ पिन फुफ्फुसात गेली. ज्यामुळे तिला श्वासोच्छवास घेण्यात अडचण तर येत होतीच, शिवाय ती पिन फुफ्फुसात जाऊन अडकली(Surgery for Indian woman who inhaled nose pin).
फुफ्फुसात अडकली नोझ पिन आणि मग..
३५ वर्षीय महिलेचं नाव वर्षा साहू असे आहे. बीबीसीला (BBC) माहिती देताना त्या म्हणाल्या, 'लग्नानंतर मी नाकात नोझ पिन घातली होती. माझ्या नाकात १६ ते १७ वर्षांपासून नाकात नोझ पिन होती. दोन महिन्यांपूर्वी मी दीर्घ श्वास घेतला. माहित नव्हतं, नोझ पिन लूज झाली होती, आणि ती श्वासोच्छवासाच्या पाईपद्वारे फुफ्फुसात जाऊन अडकली.
'श्वास घेण्यास त्रास होता, म्हणून डॉक्टरांकडे गेले'
मार्चदरम्यान, वर्षाला यांना श्वास घेण्यात अडचण, खोकला आणि न्यूमोनियाचा त्रास होऊ लागला. त्रास वाढल्यानंतर त्या डॉक्टरांकडे गेल्या. त्यांना असे वाटले की, हा त्रास नाकाला आधी झालेल्या दुखापतीमुळे झाला असावा. पण तपासाअंती कळले की, फुफ्फुसात नोझ पिन अडकले आहे.
औषधे घेऊनही वर्षाला आराम मिळत नव्हता. त्यामुळे तिने फुफ्फुसं चेक करण्याचं ठरवलं. सीटी स्कॅनमध्ये डॉक्टरांना त्यांच्या विंडपाइपमध्ये धातूची वस्तू अडकल्याचे दिसून आले. यानंतर एक्स-रे केलं. त्यानंतर फुफ्फुसात नोझ पिन अडकल्याचे दिसून आले.
डॉक्टरांनी ऑपरेशन करून नोझ पिन बाहेर काढले
मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कोलकाता येथील फुफ्फुसाचे डॉक्टर देबराज जश यांनी, शस्त्रक्रिया करून वर्षा यांच्या फुफ्फुसातील पिन काढली. याबाबत डॉक्टर जश सांगतात, 'काही प्रकरणांमध्ये, ड्राय फ्रूट्स किंवा पान मसाला लोकांच्या फुफ्फुसात प्रवेश करतात. पण ही केस वेगळी होती. वर्षा वेळीच आल्या म्हणून, त्यांच्या फुफ्फुसातून नोझ पिन काढणे शक्य झाले.'
तुम्हाला लव्हेरिया नाही पण 'लव्ह ब्रेन'चा आजार नक्की असेल, पाहा ही लक्षणे.. आजार गंभीर आहे..
ऑपरेशनबद्दल ते पुढे म्हणतात, 'सावधानीने आम्हाला हे ऑपरेशन करावे लागले. कारण श्वास नलिकेतून आम्हाला नोझ पिन काढायचे होते. विंडपाईप खूप पातळ आणि नाजूक असते. जर चुकूनही दुखापत झाली तर, रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. जे प्राणघातक ठरू शकते. परंतु, ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. शिवाय वर्षाला रुग्णालयातून लवकर सोडण्यातही आले.'