Join us  

'हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा विचारही कधी केला नव्हता..' आईच्या निवृत्तीच्या दिवशी लेकाचं खास सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 5:39 PM

Surprise Gift To Mother On Retirement : हे दृश्य पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

आपलं कुटुंब समृद्ध व्हावं, आनंदी राहावं म्हणून पालक आयुष्यभर कष्ट करतात. पालक निवृत्ती घेतात तेव्हा त्यांना कार्यालयाकडून सन्मानपूर्वक निरोप दिला जातो. त्याच वेळी कुटुंबातील सदस्य आनंदाने सर्वांना सांगतात की आता आपले पालक निवृत्त झाले आहे. आईच्या निवृत्तीच्या दिवशी एका मुलाने माऊलीचा असा सन्मान केला जे पाहून सोशल मीडिया युजर्स अवाक् झाले. ( Mother retirement son gave helicopter joy riding to family plot given on moon)

आदर्श सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका बिमला देवी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मुलगा अरविंद कुमार यांच्याकडून त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ही आगळीवेगळी घटना राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ उपविभागातील घस्सू गावातील आहे.

आईच्या निवृत्तीनंतर जॉय रायडिंग

गावात हेलिकॉप्टर आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वास्तविक, घस्सू गावातील आदर्श सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक सुलतान सिंग यांच्या पत्नी बिमला देवी या त्याच शाळेत कार्यरत होत्या.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी बिमला देवी निवृत्त झाल्या या प्रसंगी त्यांचा मुलगा अरविंद कुमार याने दिल्लीहून हेलिकॉप्टर मागवले आणि आई-वडिलांसह कुटुंबातील सदस्यांना आनंदाची सफर घडवून आणली. एवढेच नाही तर  हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हे दृश्य पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

तरुणीनं जॉब प्रोफाइल म्हणून लिहिलं सेक्स वर्क, LinkedIn वर वाद; पोस्ट व्हायरल

 मुलाकडून सरप्राईज गिफ्ट मिळाल्याने आई बिमला देवी खूप भावूक झाल्या. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा विचार कधीच केला नव्हता, पण मुलाने हे स्वप्न पूर्ण केले आहे, आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. असे त्या म्हणाल्या.

गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला चांगलंच बुकलून काढलं; मेट्रोमधल्या जोडप्याच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल

या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडूनही चोख व्यवस्था करण्यात आली होती. अरविंद 2020 पासून पायनियर एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम करत आहे.  अरविंद त्यांच्या पालकांना एक व्हर्च्युअल मेटाव्हर्समध्ये घर आणि चंद्रावरचा प्लॉट भेट देत  असल्याच्या चर्चा आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया