Join us  

अजबच आहे! आजीनं दिला नातवाला जन्म; लेकीसाठी आईनं सोसली ‘आईपणाची’ वेदना..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 4:46 PM

Surrogacy woman gives birth to her own grandson : ''शाळेच्या दिवसात मला खूप वाईट वाटायचं कारण सगळ्या मुलींना पाळी यायला सुरूवात झाली होती. मलाच येत नव्हती.''

सोशल मीडियावर कधी काय ऐकायला मिळेल याचा नेम नाही. ऑस्ट्रेलियातील एका महिलेनं आपल्या नातीला म्हणजेच मुलीच्या मुलाला जन्म दिला आहे. मॅरी अर्नोल्ड आपली मुलगी मेगन व्हाईटसाठी सरोगेटेड मदर बनली. मेगनला १७ वर्ष वयात मेअर रोकितांस्की मिस्टर डॉसर सिंड्रोम बद्दल कळलं. हा एका प्रकारचा आजार आहे. ज्यात  मुलींना जन्मत:च गर्भाशय नसतं.यामुळे ती कधी आई बनू शकत नाही.  (Surrogacy woman gives birth to her own grandson after daughter was born without a uterus)

५४ वर्षांच्या मॅरीला माहीत होते की तिची मुलगी कधीच आई बनू शकत नाही.  म्हणून त्यांनी आपल्या मुलीसाठी आई बनण्याचा निर्णय घेतला. मॅरीच्या आधीही कॅनडातील एक महिला मेगनसाठी सरोगेटेड आई बनली होती पण प्रेग्नंसीच्या २१ व्या आठवड्यातच तिच्या बाळाचा पोटात मृत्यू झाला.  त्यामुळे मेगनचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. खूप रिसर्च केल्यानंतर त्यांना कळलं की ती स्वत: आपल्या मुलीसाठी  सरोगेटेड आई बनू शकते. 

मॅरीनं ऑपरेशनच्या माध्यमातून आपला नातू विंस्टनला जन्म दिला. हा आगळा वेगळा प्रकार आहे.  स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखीतत मेगननं सांगितलं की, ''विंस्टनला माझ्या कुशीत घेतल्यानंतर मला स्वप्न सत्यात उतरल्याप्रमाणे जाणवलं. पाहताच क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले.'' आपल्या कठीण प्रसंगांना आठवत मेगननं सांगितले की, ''शाळेच्या दिवसात मला खूप वाईट वाटायचं कारण सगळ्या मुलींना पाळी यायला सुरूवात झाली होती. मलाच येत नव्हती.

इलियाना डिक्रूज एडीट न करताच शेअर केला बिकनीतील बोल्ड फोटो; अन् म्हणाली.....

मी पाळी येण्याची खूप वाट पाहिली. पण डॉक्टरांना भेटल्यानंतर मला कळलं की,  MRKH (मेयर-रोकितांस्की-मिस्टर-हॉसर सिंड्रोम) हा आजार मला झालाय. म्हणजेच मी गर्भाशयाशिवाय बाळाला जन्म दिला होता.  म्हणजेच माझ्या शरीरात गर्भशय नव्हतं. सरोगसी द्वारे बायोलॉजिकल मदर बनण्याशिवाय काही पर्याय नव्हता.''जन्म दिल्यानंतर आजीनं सांगितलं की, ''नातवाला जन्म देणं माझ्यासाठी इतकं सोपं नव्हतं. माझ्या मुलीचं दु:ख पाहावलं न गेल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी हे पाऊल उचललं. ''

टॅग्स :प्रेग्नंसीसोशल मीडियासोशल व्हायरल