Join us  

‘ती ४५ मिनिटं आयुष्यात...’ हार्ट ॲटॅक आला तो दिवस आठवून सुश्मिता सेन झाली इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 4:56 PM

Sushmita Sen Recalls Her Maasive Heart Attack : माझ्या आयुष्याला एक मोठं वळण लागलं जेव्हा मला हृदय विकाराचा झटका आला

अभिनेत्री सुश्मिता सेननं (Sushmita Sen) अलिकडेच सांगितले की इंस्टाग्रामवर तिने दुसरा जन्मदिन असं लिहिलेलं ती त्याच दिवशीची कहाणी  आहे, जेव्हा तिला हार्ट अटॅक आला होता. ते ४५ मिनिटं आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग असल्याचं तिने म्हटलं आहे आणि डॉक्टरांप्रती आभार व्यक्त केले आहेत. सुश्मिताने एका व्हिडीओत सांगितले की, ही माझ्या जीवनाची अशी कहाणी आहे जी मी लढली आणि जगलीसुद्धा. माझ्या आयुष्याला एक मोठं वळण लागलं जेव्हा मला हृदय विकाराचा झटका आला. (Sushmita Sen Recalls Her Maasive Heart Attack She Described Those 45 Minutes As The Toughest Moments Of Life)

या पोस्टमध्ये तिने लिहिलं की, 45 मिनिटे मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मिनिटे वाटली आणि एका वेळी मला वाटले की माझी कहाणी आता संपली आहे. ती पुढे म्हणाली, 'पण माझ्या डॉक्टरांचे आभार, माझी कहाणी पुढे चालू राहिली आहे. आयुष्याने मला सोडले नाही, आणि मी ही ते सोडले नाही. डॉक्टरांनी माझ्या आयुष्यात एक नवा अध्याय लिहिला आणि मला नवी दिशा दिली. तो दिवस आता माझा दुसरा वाढदिवस आहे, जो सर्व डॉक्टरांना समर्पित आहे.

डॉक्टरांनी जीवन जगण्याचा दुसरा मार्ग दाखवला

सुश्मिता सेनने तिचा जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय पथकाचेही कौतुक केले आणि म्हणाली, 'माझ्या डॉक्टरांनी मला आयुष्यात दुसरी संधी दिली आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार मानू इच्छिते.' सुश्मिताला जयपूरमध्ये तिच्या वेब सीरिज 'आर्या'च्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता.

टॅग्स :सुश्मिता सेनहृदयविकाराचा झटका