Lokmat Sakhi >Social Viral > सुष्मिता सेनची भूमिका पाहून लेकीनं दिली खास प्रतिक्रिया, मायलेकींचं एकमेकींसोबत असणं ठरलं महत्त्वाचं...

सुष्मिता सेनची भूमिका पाहून लेकीनं दिली खास प्रतिक्रिया, मायलेकींचं एकमेकींसोबत असणं ठरलं महत्त्वाचं...

Sushmita Sen reveals daughter Renee was 'worried' about her playing a transgender, here's why : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिची मोठी मुलगी रेनी सेन (Renee sen) , आईच्या कामाची दाद कशी देते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 02:47 PM2023-08-11T14:47:06+5:302023-08-11T15:00:32+5:30

Sushmita Sen reveals daughter Renee was 'worried' about her playing a transgender, here's why : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिची मोठी मुलगी रेनी सेन (Renee sen) , आईच्या कामाची दाद कशी देते..

Sushmita Sen Reveals Daughter, Renee's Reaction To Her Playing Transgender In 'Taali': 'Was Worried' | सुष्मिता सेनची भूमिका पाहून लेकीनं दिली खास प्रतिक्रिया, मायलेकींचं एकमेकींसोबत असणं ठरलं महत्त्वाचं...

सुष्मिता सेनची भूमिका पाहून लेकीनं दिली खास प्रतिक्रिया, मायलेकींचं एकमेकींसोबत असणं ठरलं महत्त्वाचं...

मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या तिच्या आगामी ‘ताली’ या वेबसीरिजमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ‘ताली’ ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. यात सुष्मिता सेन गौरी सावंत यांची प्रमुख भूमिका साकारत आहे. आतापर्यंत बॉलिवूड आणि इतर चित्रपटांत तृतीयपंथीची भूमिका निभावण्याची जबाबदारी अनेक पुरुष अभिनेत्यांनी पार पाडली आहे. अशातच एक बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री तृतीयपंथीची भूमिका निभावणार असल्याने नेटकऱ्यांसह सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सुष्मिताचा लूक पाहून ती ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट होत असून हे पहिल्यांदाच घडणार आहे. अभिनेत्री गौरी सावंत हिच्या जीवनाचे चित्रण या वेब सिरीजमधून करणार आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन गौरी सावंत हिच्या जीवनाचे चित्रण या वेब सिरीजमधून करणार आहे.   

गौरी सावंत यांनी केवळ ट्रान्सजेंडर समुदायाच्या बाजूनेच आवाज उठवला नाही तर त्यांना समाजात आदर आणि सन्मान मिळवून देण्यासाठी खूप काम केले आहे. त्यामुळे सुष्मिताला हे पात्र खूप आवडले असल्यामुळे ती ही भूमिका करण्यासाठी तयार झाली असल्याचे समजते. अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती दोन्ही हातांनी टाळ्या वाजवताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे(Sushmita Sen Reveals Daughter, Renee's Reaction To Her Playing Transgender In 'Taali': 'Was Worried').

सुष्मिताच्या भूमिकेविषयी...

सुष्मिता सेनने या वेब सिरीजचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर रिलीज केला आहे. तिचा लूक पाहून ती सर्वस्तरातून तिचे कौतुक होत आहे. ज्यामध्ये सुष्मिता सेन एक मोठी लाल टिकली, लाल लिपस्टिक लावून दोन्ही हातांनी टाळ्या वाजवताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत सुष्मिता सेनने कॅप्शनमध्ये लिहिले- ''टाली - बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी !' असे तिने म्हंटले आहे.  प्रथम श्री गौरी सावंत म्हणून पहा. या अद्भुत व्यक्तिमत्त्वाची भूमिका मी साकारणार आहे आणि त्यांची कहाणी जगासमोर आणणार आहे, माझ्यासाठी यापेक्षा दुसरी कुठलीही अभिमानाची गोष्ट असू शकणार नाही. 'गौरी सावंत' साकारणे हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान असणार आहे, असेही तिने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले. या वेबसिरीजमध्ये गौैरी आणि तिने दत्तक घेतलेल्या मुलीचे नाते दाखवण्यात येणार आहे. याबाबत सुष्मिताला विचारण्यात आले तेव्हा ट्रान्सजेंडर गौरीचे पात्र तिला अतिशय आवडल्याचे तिने सांगितले.

कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या करोडपती ! वर्गणी काढून घेतलं लॉटरीचं तिकिट आणि नशिब पालटलं..

उत्तरप्रदेशात बायका म्हणाल्या आता बास ! 'ग्रीन आर्मी' शिकवतेय बायकांना छळणाऱ्यांना धडा...

मिस युनिव्हर्सने भूमिका साकारणे ही मोठी बाब... 

गौरी सावंत यासंदर्भात सांगतात, माझ्यासाठी आणि माझ्या समाजासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे की पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची कथा दाखवली जात आहे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही सामान्य अभिनेत्री नाही तर मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन स्वतः माझी भूमिका साकारत आहेत. सुमारे दीड वर्षापूर्वी, निर्मात्या आफिफा नाडियाडवाला, ज्या माझ्या मैत्रीणही आहेत, त्यंनी मला विचारले की, त्या माझ्यावर चित्रपट बनवू शकतात का? त्यावेळी मला खात्री नव्हती की, खरंच ती असे काहीतरी करेल. त्यावेळी मला वाटले की ती फक्त गंमत करत आहे. पण त्यानंतर तिने हा प्रोजेक्ट सुरू केला आणि जवळपास वर्षभरानंतर तो पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

बार्बी डॉल वो लाखों की! बार्बीसारखं दिसण्यासाठी ‘तिने’ खर्च केले ८२ लाख...

सुष्मिता सेनच्या लेकीचा आनंद... 

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत, सुष्मिता सेनने वेब सीरिजमध्ये ट्रान्सजेंडरची भूमिका साकारल्याबद्दल तिच्या मुलींनी कशी प्रतिक्रिया दिली हे उघड केले आहे. सुष्मिताने सांगितले की ही भूमिका पडद्यावर साकारताना तिला तिची मोठी मुलगी रेनी सेन (Renee sen) हिला मत विचारण्याची गरजच भासली नाही. सुष्मिताने शेअर केले की, तिच्या दोन्ही मुलींना हे समजल्यानंतर त्यांनी उत्साही होऊन आनंदाने उड्याच मारल्या. त्याचबरोबर आईच्या या नव्या भूमिकेबद्दल तिचे कौतुक केले.

Web Title: Sushmita Sen Reveals Daughter, Renee's Reaction To Her Playing Transgender In 'Taali': 'Was Worried'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.