Join us  

स्वरा भास्करला असे का वाटते की, आपण सगळेच कधीच आईचे पुरेसे आभार मानत नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2023 4:40 PM

Swara Bhasker on childbirth: Hardest thing I’ve ever done : स्वरा भास्करने अलीकडेच तिच्या बाळंतपणाच्या अनुभवाबद्दल खुलासा केला "मी आतापर्यंत केलेली सर्वात कठीण गोष्ट" असे का म्हणते ती ?

'मातृत्व' ही जगातली एक सुंदर आणि शब्दांत वर्णन न करता येण्यासारखीच भावना आहे. 'आई होणे' हा स्त्रीचा दुसरा जन्मच असतो, असे आपल्याकडे म्हटले जाते. आई होताना स्त्रीला अनेक पातळ्यांतून प्रवास करत खूप मोठी प्रक्रिया पार पाडत शेवटी आई होण्याचा अनुभव घेता येतो. एखादी स्त्री जेव्हा एखाद्या लहान बाळास जन्म देते त्यावेळेस तिला 'मातृत्व' प्राप्त होते, समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील ती एकमेव स्त्री आहे जी कोणत्याही हेतू शिवाय आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करते. मूल म्हणजे आईसाठी सर्वस्व असते(Swara Bhasker Says Childbirth Is The Hardest Thing: ''We Don't Thank Our Mothers Enough'').

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने नुकताच आई होण्याचा अनुभव घेतला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर तिने केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे बरीच ट्रोल झाली होती. तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्न केले. तिच्या लग्नानंतरच्या काहीच काळात तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी सोशल मिडीयावर मोठाच गोंधळ निर्माण झाला होता. अशाप्रकारे आपले लग्न आणि प्रेग्नंन्सीला घेऊन कायम चर्चेत असणाऱ्या स्वराने २३ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या पहिल्या जन्मलेल्या, (Swara Bhaskar and Fahad Ahmed are now parents to a newborn daughter Raabiyaa) मुलीचे म्हणजेच राबियाचे स्वागत केले. या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही बातमी जाहीर करताना मुलीसोबतचे मोहक फोटो शेअर केले आहेत. पालकत्वाच्या या नव्या प्रवासाचा आनंद घेत असताना, स्वरा भास्करने अलीकडेच तिच्या बाळंतपणाच्या अनुभवाबद्दल खुलासा केला. "मी आतापर्यंत केलेली सर्वात कठीण गोष्ट" असे संबोधून अभिनेत्रीने रुग्णालयातील डॉक्टर आणि टीमकडून मिळालेल्या सर्व मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे(Swara Bhasker opens up on the journey of motherhood: "It's the hardest thing I've ever done").

स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत... 

ETimes शी बोलताना, अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या जन्माला “आशीर्वाद” म्हणून संबोधले आहे. “मला विश्वासच बसत नाही की स्त्रियांनी हजारो वर्षांपासून हा आई होण्याचा अनुभव अनेकवेळा घेतला आहे!!” (Swara Bhasker On Childbirth: 'I Can’t Believe Women Have Done This For Millennia Without Epidurals, Multiple Times') तसेच, हॉस्पिटलमधील मदत आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, अभिनेत्री म्हणाली, “आम्हाला हॉस्पिटलमधील डॉक्टर, टीम आणि इतर कर्मचारी यांच्याकडून मिळालेल्या सर्व मदतीबद्दल मी आणि फहाद त्यांचे खूप खूप आभारी आहोत. यांच्यासोबतच आमचे कुटुंब, मित्रपरिवार आणि हितचिंतक यांनी दिलेला पाठिंबा, प्रेम आणि शुभेच्छा याबद्दल देखील खूप धन्यवाद. बाळंतपणाचा अनुभव तुम्हाला खरोखरच जाणीव करुन देतो की, आपण आपल्या आईचे पुरेसे आभार मानत नाही.” तुमच्या सगळ्यांकडून मिळालेले प्रेम आणि शुभेच्छा यातच आम्ही धन्यता मानतो. बाळंतपणाचा अनुभव घेतल्यानंतर स्वराने एक सुंदर वाक्य म्हणत आपल्या आईप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, आईने आपल्याला एवढं सगळं सोसून जन्म दिल्यानंतरही आपण तिचे पुरेसे आभार मानत नाही, हे बाळंतपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर मला जाणवले आहे". 

तब्बल ८३ लाख पगार देतो पण मुले सांभाळायला मदतनीस हवी, अमेरिकन राजकीय नेत्यासमोर मोठा प्रश्न...

कियाराच्या आईने लाडक्या लेकीसाठी केले खास सिंधी पदार्थ, कियारा इमोशनल होत म्हणाली...

स्वराने तिच्या लहान मुलीचे आणि स्वतःचे पती फहादसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि तिच्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली. तिने लिहिले, "एक प्रार्थना ऐकली, एक आशीर्वाद मिळाला, एक गाणे एक गूढ सत्य कुजबुजते. आमची मुलगी राबियाचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. कृतज्ञ आणि आनंदी अंतःकरणाने, तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद ! हे संपूर्ण नवीन जग आहे." असे सुंदर कॅप्शन लिहीत तिने मुलीच्या जन्माचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

करीना कपूर का म्हणतेय आई व्हायचं ठरवलं ना, मग आता चिडचिड कशाला? आता करा..

टॅग्स :सोशल व्हायरल