मासिक पाळीच्या वेदना प्रत्येक महिलेसाठी त्रासदायक ठरतात. महिन्याचे ते ४ दिवस वेदना सहन करत घर, ऑफिसच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करणं खरोखरच एखाद्या टास्क प्रमाणे असते. अशावेळी महिलांना कोणतीही मदत केली तर त्यांना तेव्हढाच आधार वाटतो पण जेव्हा मदतीसाठी कोणीही नसते तेव्हा त्यांना खूपच त्रास सहन करावा लागतो. (Swiggy Delivery Agent Bought Painkiller Meftal For Ranchi Women Customer)
झारखंडची राजधानी रांची येथे एका महिलेने फूड डिलिव्हरी एजेंटचे कौतुक करत तिच्या सोबत घडलेला प्रकार सोशल मीडिया युजर्स सोबत शेअर केला आहे. महिलेने फोटो शेअर करत आपबीती सांगितली त्यानंतर लोक फूड डिलिव्हरी एजेंटचे कौतुक करत आहेत. (Delivery agent’s act of kindness touches hearts, Internet reacts)
I had sharp cramps and couldn’t walk to the medical store, so ordered food on @Swiggy and asked the delivery agent if he could buy me a medicine. He was really kind enough to get me one. I made sure to tip him and thank him for his kindness ✨ pic.twitter.com/SEKegLiwaQ
— Nandini Tank (@NandiniRavita) April 21, 2024
महिलेला खूपच त्रास सहन करावा लागत होता. पण ती पेनकिलर घेण्यासाठी मेडिकलपर्यंतही जाऊ शकत नव्हती. म्हणूनच तिने स्विगीवरून जेवण मागवले. जेव्हा तिने जेवण ऑर्डर केले तेव्हा डिलिव्हरी एजंटला आपल्यालासाठी पेन किलर आणू शकतो का अशी विचारणा केली. त्यानंतर या व्यक्तीने महिलेची मदत करत तिच्यासाठी मेडिकलमध्ये गेला आणि वेळेच पेनकिलर आणून दिली.
रांच्या रहिवासी असलेल्या नंदिता यांनी सांगितले की, त्यांना बऱ्याच वेदना होत होत्या पण मेडीकलपर्यंत जाण्याचीही हिंमत होत नव्हती. म्हणून त्यांनी स्विगीवर जेवण ऑर्डर केलं आणि जेवण आणणाऱ्या डिलिव्हरी एंजेंटला येताना मेफ्टल स्पास ही गोळी आणण्यास सांगितले. त्यानंतर डिलिव्हरी एंजटने आपले पूर्ण १०० टक्के देत त्या महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला.
उन्हात न जाता व्हिटामीन डी कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना येईल भरपूर ताकद
औषधांचा फोटो पोस्ट करत नंदीता यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'मला मोठ्या प्रमाणात वेदना जाणवत होत्या पण मी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊ शकत नव्हती. म्हणून स्विगीवरून जेवण मागवलं आणि डिलिव्हरी एंजेंटला येताना गोळी आणायला सांगतली. तो इतका दयाळू होता की त्याने माझं म्हणणं ऐकत मला लगेच मदत केली आणि हवी ती गोळी आणून दिली. मला तात्काळ केलेल्या मदतीबद्दल मी त्याचे आभार मानते.'
गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल
नंदिता यांनी रात्री ११ वाजता जेवण ऑर्डर केले होते. जेवणाच्या बिलाचा फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. १ लाखापेंक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लाईक्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.