Lokmat Sakhi >Social Viral > टेकिंग अ रिस्क टू बी हॅपी! - ब्रेकअपने काय शिकवलं, सांगतेय सुश्मिता सेन..

टेकिंग अ रिस्क टू बी हॅपी! - ब्रेकअपने काय शिकवलं, सांगतेय सुश्मिता सेन..

रोहमनशी ब्रेकअपनंतर सुश्मिताचा आनंदी राहण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 11:47 AM2021-12-30T11:47:43+5:302021-12-30T13:43:22+5:30

रोहमनशी ब्रेकअपनंतर सुश्मिताचा आनंदी राहण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Taking a risk to be happy! - What did breakup teach, says Sushmita Sen .. | टेकिंग अ रिस्क टू बी हॅपी! - ब्रेकअपने काय शिकवलं, सांगतेय सुश्मिता सेन..

टेकिंग अ रिस्क टू बी हॅपी! - ब्रेकअपने काय शिकवलं, सांगतेय सुश्मिता सेन..

Highlightsसुश्मिता सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त करत असतेरोहमन शॉलशी ब्रेकअपनंतर सुश्मिताच्या लाईफ लेसन देणाऱ्या पोस्ट

"Taking a risk to be Happy" म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे रोहमन शॉल याच्याशी ब्रेकअप झाले असून त्याविषयी तिने स्वत: सोशल मीडियावरुन आपल्या फॅन्सना सांगितले होते. सुश्मिताच्या बऱ्याच वर्षांच्या या नात्याच्या ब्रेकअपची बातमी तिच्या फॅन्ससाठी धक्कादायक होती. या ब्रेकअपमागचे नेमके कारण समोर आले नाही, मात्र आयुष्यात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात अशा आशयाची एक पोस्ट तिने त्यानंतर शेअर केली होती. त्यानंतरही सुश्मिता सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त करत असल्याचे दिसते. आता सुश्मिताची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हसताना दिसतेय. या पोस्टमध्ये सुष्मिता लिहिते, जगण्यासाठी जोखीम पत्करण्याची इच्छाशक्ती हवी… आनंदी राहण्यासाठी जोखीम पत्करण्यासाठी हिंमत गरजेची असते. तुमच्यात हिंमत आहे मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, आपण सर्व करू शकतो. आय लव्ह यू. सुष्मिताची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देत असून एका चाहत्यानं लिहिलंय, तू अप्रतिम आहेस, तर दुसऱ्याने तू जगातील सर्वात सुंदर आत्मा आहेस असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टला लाखो चाहत्यांनी लाइक केलंय.

याबरोबरच तिने आणखी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर केली आहे. त्यामध्ये सुश्मिताने तिचा एक खूप सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. त्याच्या खाली कॅप्शनमध्ये ती म्हणते, “जिथे प्रोजेक्शन संपते तिथून आत्मविश्वासाला सुरूवात होते.” आपल्या या पोस्टला तिने अनेक सकारात्मक हॅशटॅगही दिले आहेत. ज्यात ग्राऊंडींग, लाइफ लेसन्स, स्टेईंग ट्रू, इनर स्ट्रेंथ, मुव्हेबल, अनशेकेबल यांचा समावेश आहे. सुश्मिताची मुलगी रैनी हिने तिच्या या पोस्टवर यु आर ऑन फायर म्हणत कमेंट केली आहे, ज्यावर सुश्मिताने रैनी फायर सेन, आय लव्ह यू असं म्हणत तिला रिप्लाय दिला आहे. एकूणच आपल्या ब्रेकअपच्या दु:खातून स्वत:ला सावरायचा प्रयत्न सुश्मिता अशप्रकारच्या पोस्टच्या माध्यमातून करत आहे. सध्या ब्रेकअप नंतरची तिची ही पोस्ट सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच तिच्या मुलीने यावर प्रितिक्रिया दिल्याने चाहत्यांनी या पोस्टला जास्तच सिरीयस घेतल्याचे दिसते. 


सुश्मिता सेन म्हणजे भारताची पहिली मिस युनिव्हर्स. प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या सुश्मिताने अतिशय कमी वयात सिंगल मदर होण्याचा निर्णय घेत दोन मुलींना दत्तक घेतले होते. आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुश्मिता कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. रेहमन सुश्मिताशी ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या घरुन निघून आपल्या मित्राच्या घरी राहायला गेला असल्याची चर्चा होती. सुश्मिता इन्स्टाग्रामवर बरीच अॅक्टीव्ह असते आणि तिचे फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे. त्यामुळे तिच्या या दोन्ही पोस्टवरही काही तासांत हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे तर बऱ्याच जणांनी नेहमीप्रमाणे तिचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुश्मिता नुकतीच आर्य सीझन २ या बेव सिरीजमध्ये दिसली होती, यातील तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी कौतुक केले होते. 

Web Title: Taking a risk to be happy! - What did breakup teach, says Sushmita Sen ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.