तामिळनाडूच्या अनेक भागात जोरदार पावसानं हाहाकार माजवला. चेन्नईतील मुसळधार पावसातील एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. एक महिला पोलिस कर्मचारी बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची मदत करण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसून येत आहे. कसलाही विचार न करता पावसात बेशुद्ध पडलेल्या तरूणाला खांद्यावर घेत त्या हॉस्पिटलला पोहोचल्या. (Chennai rain woman police inspector carries unconscious man) बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला मदत करणाऱ्या या पोलिस महिलेचं नाव राजेश्वरी आहे. हा व्हिडीओ टीपी छत्रम येथून समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजेश्वरी यांचे तुफान कौतुक केलं जात आहे.
चेन्नईचे पोलिस आयुक्त शंकर जिवाल यांनीही राजेश्वरी यांच्या कामाची दाद दिली आहे. राजेश्वरी नेहमीच असं काम करत असल्याचं सांगत त्यांनी कौतुकानं पाठ थोपाटली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सुरूवातीला त्या बेशुद्ध तरूणाला घेऊन गाडीजवळ जातात. पण तिथे त्यांना तरूणाला ठेवता येत नाही नंतर एका रिक्षात त्या तरूणाला झोपवून हॉस्पिटलला पाठवतात.
कामाचे तास संपल्यानंतर बॉसचा मेसेज आता illegal; 'वर्क फ्रॉम होम'मध्ये लाईट बीलंही कंपनी भरणार
समोर आलेल्या माहितीनुसार बेशुद्ध पडलेल्या तरूणाचं वय २८ वर्ष होतं. मुसळधार पावसामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या अनेक भागात पाणी शिरलं. तर चेन्नईत पूरस्थिती निर्माण झाली होती. शनिवारपासून राज्यात मुसळधार पावसामुळे जवळपास १३ लोकांना आपला जीव गमवावा लागला. अशा स्थितीत एक तरूणाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिसानं सगळ्यांचच मन जिंकून घेतलं आहे.