Lokmat Sakhi >Social Viral > शाळेत उशीरा आल्याने विद्यार्थिनींना टॉयलेट साफ करण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल

शाळेत उशीरा आल्याने विद्यार्थिनींना टॉयलेट साफ करण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल

Teacher got the students cleaned toilet : वेळेवर न आल्याची शिक्षा म्हणून शाळा प्रशासनाने टॉयलेट साफ करण्यास सांगितल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:56 PM2022-07-27T15:56:35+5:302022-07-27T16:20:40+5:30

Teacher got the students cleaned toilet : वेळेवर न आल्याची शिक्षा म्हणून शाळा प्रशासनाने टॉयलेट साफ करण्यास सांगितल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

Teacher got the students cleaned toilet because they reached school late in gadag karnataka | शाळेत उशीरा आल्याने विद्यार्थिनींना टॉयलेट साफ करण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल

शाळेत उशीरा आल्याने विद्यार्थिनींना टॉयलेट साफ करण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील गडग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  शाळेतील विद्यार्थीनी शौचालय साफ करताना दिसून आल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शाळेतील स्वयंपाकीण बाई विजयलक्ष्मी यांनी १२ जुलैला शुट केला होता. (Teacher got the students cleaned toilet)

ही घटना नागवी, गदग येथील शासकीय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेची आहे. दरम्यान, शाळेतील स्वच्छतागृहे साफ करताना इयत्ता 6 वी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर गदग येथील शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Teacher got the students cleaned toilet because they reached school late in gadag karnataka)

वेळेवर न आल्याची शिक्षा म्हणून शाळा प्रशासनाने टॉयलेट साफ करण्यास सांगितल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. TOI वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, स्वयंपाकीण बाई विजयालक्ष्मी म्हणाल्या, ''मी शाळेत असताना विद्यार्थी शौचालय स्वच्छ करण्यासाठी बादल्या आणि झाडू घेण्यासाठी माझ्याकडे आले. शिक्षकांनी तसे करण्यास सांगितले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मला वाटले की हे योग्य नाही. आणि अशा प्रकारे मी ही घटना माझ्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून व्हॉट्सअॅपवर शेअर केली.''

'तू कधीच पास होणार नाही'! म्हणत अपमान करणाऱ्या टिचरला विद्यार्थिीने दिलं आपल्या कृतीनं उत्तर..

हा व्हिडीओ व्हायरल होताच स्वयंपाकीण बाईंना व्हिडिओ शेअर केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले की, 'खूप दुःखद आणि निषेधार्ह कृती. दोषींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही एक सरकारी शाळा आहे, जिथे  असं होणं धक्कादायक घटना आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलंय

Web Title: Teacher got the students cleaned toilet because they reached school late in gadag karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.