Lokmat Sakhi >Social Viral > पोरं आयुष्यभर विसरणार नाही अभ्यास! या शिक्षकाची वर्णमाला शिकवण्याची स्टाईल होतेय व्हायरल

पोरं आयुष्यभर विसरणार नाही अभ्यास! या शिक्षकाची वर्णमाला शिकवण्याची स्टाईल होतेय व्हायरल

Teacher taught alphabet to children : व्हिडीओमध्ये एक शिक्षक खोलीत ब्लॅकबोर्डसमोर उभा असल्याचे दिसत आहे, ज्यावर हिंदी वर्णमालेची काही अक्षरे लिहिली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 10:02 AM2022-11-08T10:02:33+5:302022-11-08T10:42:12+5:30

Teacher taught alphabet to children : व्हिडीओमध्ये एक शिक्षक खोलीत ब्लॅकबोर्डसमोर उभा असल्याचे दिसत आहे, ज्यावर हिंदी वर्णमालेची काही अक्षरे लिहिली आहेत.

Teacher taught alphabet to children in a unique way teacher teaches hindi alphabets using a song | पोरं आयुष्यभर विसरणार नाही अभ्यास! या शिक्षकाची वर्णमाला शिकवण्याची स्टाईल होतेय व्हायरल

पोरं आयुष्यभर विसरणार नाही अभ्यास! या शिक्षकाची वर्णमाला शिकवण्याची स्टाईल होतेय व्हायरल

प्रत्येक शिक्षकाची मुलांना अभ्यास समजवून सांगण्याची वेगळी शैली असते. लहान मुलांना शिकवणं काही सोपं काम नाही.  ती ही जेव्हा एक-दोन नव्हे तर अनेक मुले एकत्र बसून अभ्यास करतात. हे आव्हान शिक्षकांसाठी देखील पूर्ण आहे, परंतु काही शिक्षक असे आहेत जे वर्गातील मुलांवर नियंत्रण ठेवत त्यांना गेममधील अवघड विषय सहज समजावून देतात. यामुळे मुलं अभ्यासाचा ताण न घेता आनदानं सर्व काही शिकतात. या व्हिडिओमध्ये  आपण पाहू शकता शिक्षकांनी मुलांना शिकवण्यासाठी अशी युक्ती शोधून काढली आहे जे पाहून तुम्हीही चकीत व्हाल. (Teacher taught alphabet to children in a unique way teacher teaches hindi alphabets using a song)

असे म्हटले जाते की एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो, कारण तो त्यांना कठोर परिश्रम करून काहीतरी साध्य करण्यासाठी प्रेरित करतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक शिक्षक वर्गात बसलेल्या लहान गोंडस मुलांना अतिशय मजेशीर पद्धतीने हिंदी वर्णमाला शिकवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक या शिक्षकाच्या शिकवण्याच्या पद्धतीचे चाहते होत आहेत.

तांदळाच्या पीठापासून आकर्षक रांगोळी काढली, पक्ष्यांचा थवा येताच असं काही झालं, पाहा व्हिडिओ

व्हिडीओमध्ये एक शिक्षक खोलीत ब्लॅकबोर्डसमोर उभा असल्याचे दिसत आहे, ज्यावर हिंदी वर्णमालेची काही अक्षरे लिहिली आहेत. या दरम्यान, शिक्षक प्रत्येक अक्षरासाठी एक विशेष ओळ गाताना दिसतात, ज्याची मुले देखील पुनरावृत्ती करतात. हा व्हिडिओ खरोखरच अप्रतिम आहे, जो पाहून तुमचेही मन प्रसन्न होईल.  हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Ankitydv92 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो लोक खूप पाहत आहेत आणि खूप पसंत करत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'शिकवण्याचा किती अप्रतिम मार्ग आहे, महान गुरुजी.' या व्हिडिओला आतापर्यंत 341.5K व्ह्यूज मिळाले आहेत, तर 17.7K लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स त्यावर विविध मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीचे कौतुक करत आहेत. 

Web Title: Teacher taught alphabet to children in a unique way teacher teaches hindi alphabets using a song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.