Lokmat Sakhi >Social Viral > चारचौघांत काट्या- चमच्याने जेवायचं टेन्शन येतं? टेबल मॅनर्सचे हे सोपे नियम, जेवा कॉन्फिडन्टली..

चारचौघांत काट्या- चमच्याने जेवायचं टेन्शन येतं? टेबल मॅनर्सचे हे सोपे नियम, जेवा कॉन्फिडन्टली..

एखाद्या थ्री स्टार, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन काट्या- चमच्याने जेवायचं म्हटलं की जाम टेन्शन येतं ना? म्हणूनच तर टेबल मॅनर्सचे हे काही सोपे नियम वाचा आणि कॉन्फिडन्टली पोटभर जेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 01:34 PM2021-11-11T13:34:39+5:302021-11-11T13:35:56+5:30

एखाद्या थ्री स्टार, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन काट्या- चमच्याने जेवायचं म्हटलं की जाम टेन्शन येतं ना? म्हणूनच तर टेबल मॅनर्सचे हे काही सोपे नियम वाचा आणि कॉन्फिडन्टली पोटभर जेवा..

Tension of eating with a fork and knife? These simple rules of table manners, now eat confidently .. | चारचौघांत काट्या- चमच्याने जेवायचं टेन्शन येतं? टेबल मॅनर्सचे हे सोपे नियम, जेवा कॉन्फिडन्टली..

चारचौघांत काट्या- चमच्याने जेवायचं टेन्शन येतं? टेबल मॅनर्सचे हे सोपे नियम, जेवा कॉन्फिडन्टली..

HighlightsFork आणि Knife यांच्या मदतीने कसं जेवायचं याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत आहे ब्रिटीश आणि दुसरी अमेरिकन.

हॉटेलमध्ये जाऊन पंजाबी डिशेस खायच्या असतील तर आपण एकदम कुल असतो. पावभाजी आणि पिझ्झा यांच्याशीही आपली चांगली गट्टी जमलेली असते. Fork म्हणजेच फोकने नूडल्स कशा खायच्या ते ही आपण सरावाने शिकलो आहेत. पण इतर काही इटालियन, मॅक्सिकन, चायनिज पदार्थ हे Fork आणि Knife यांचा वापर करूनच खावे लागतात. नेमकं आपल्या सोबत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या पॉश हॉटेलमध्ये जाऊन असेच पदार्थ मागविले तर आपली पार गोची होऊन जाते. धड खाताही येत नाही आणि नकोही म्हणता येत नाही.

 

मग बऱ्याचदा अशावेळी आपली खूपच फजिती होते. काट्या चमच्याने तर खायचंय पण Fork कोणत्या हातात पकडायचा आणि Knife कसा धरायचा हे देखील धड उमजत नाही. अशावेळी मग जी व्यक्ती थोडीशी हुशार असते ती समोरची व्यक्ती कशी खाते आहे, याची वाट पाहत उगाच इकडे तिकडे बघत बसते. मग समोरचा माणूस जसा चमचे पकडतो, तसे चमचे पकडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्याचं बघत बघत जेवण पुर्ण करावं लागतं. या सगळ्या गोंधळात आपला कॉन्फिडन्स मात्र पार डाऊन झालेला असतो आणि तो आपल्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असतं. सगळ्यांसमोर उगीच शोभा नको म्हणून अनेक जणं अर्धवट जेवण झालेलं असतानाच पोट भरलंय,  असं सांगून जेवण थांबवतात.

 

मैत्रिणींनो कधी ना कधी प्रत्येकीची अशी फजिती झालेलीच असते. ही फजिती होऊ नये आणि आपल्यालाही एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन आत्मविश्वासने जेवता यावं म्हणून मास्टरशेफ पंकज भादुरिया यांनी टेबल मॅनर्सच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत. प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल असा हा त्यांचा व्हिडियो सगळ्यांनी आवर्जून पहावा, असाच आहे. खूप साध्या आणि सोप्या असतात या गोष्टी. पण त्या आपल्याला माहिती नसतात, म्हणून आपण उगाच त्याला घाबरतो. त्यामुळे आता घाबरणं सोडा आणि टेबल मॅनर्सचे नियम माहिती झाल्यावर मस्तपैकी एका मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन त्याचा अनुभव घ्या...

 

Fork आणि Knife कसे धरायचे याविषयी मास्टरशेफ पंकज भादुरिया यांनी सांगितलेले नियम
- Fork आणि Knife यांच्या मदतीने कसं जेवायचं याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत आहे ब्रिटीश आणि दुसरी अमेरिकन. एवढी वर्षे ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं. या काळात आपण त्यांच्या अनेक गोष्टी स्विकारल्या तशीच त्यांची जेवणाची पद्धतही आपण स्विकारली. त्यामुळे भारतात जर Fork आणि Knife यांच्या मदतीने जेवायचं असेल, तर ब्रिटिश पद्धत फॉलो केली जाते.
- जेवताना फोक हा नेहमी डाव्या हातात आणि नाईफ हा नेहमीच उजव्या हातात पकडावा.
- फोक पकडताना फोकचे काटे हे खालच्या दिशेने म्हणजे आपल्या प्लेटच्या दिशेने झुकलेले असतावेत.
- खूप खाली किंवा खूप वर फोक पकडू नये. आपला अंगठा आणि पहिले बोट यांच्या साहाय्याने फोकच्या मधोमध पकडावे.
- तसेच सगळ्याच बोटांनी फोक अगदी घट्ट पकडू नका. सैलसर परंतू व्यवस्थित ग्रीप राहील अशा सहजतेने फोक धरा.
- असेच नाईफचे आहे. जसा फोक धरला, तसाच नाईफ धरा.


- यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फोकने अन्नाचा तुकडा थोडा जोर देऊन पकडा आणि त्यानंतर त्याच्या बाजूने अलगद नाईफ फिरवून तो तुकडा कापा. एखादी करवत चालवावी, त्याप्रमाणे नाईफ अन्नावरून फिरवू नका. एकदम घास तुटत नसेल तर ३ टप्प्यात तो तोडण्याचा प्रयत्न करा. घास तोडला की तो डाव्या हातातल्या फोकने उचला आणि डाव्या हातानेच खा.
- तुमचा घास लहान असावा. कारण मोठे घास घेणं हे चांगले टेबल मॅनर्स नाहीत.
- घास तोडल्यावर खाली वाकून तो घास खाऊ नका. तुम्ही जेस आहात तसेच बसा आणि तो घास तुमच्या तोंडाजवळ आणा.
- जर ताटात अन्न उरलं असेल आणि तुम्हाला ते खायचं नसेल तर तुमचा फोक आणि नाईफ प्लेटच्या अगदी मधोमध ठेवून द्या. असं ठेवताना फोकचे काटे खालच्या दिशेने झुकलेले हवे. याचा अर्थ तुम्हाला आता जेवायचे नसून तुमचे ताट क्लिन करण्यात यावे, असा होतो. 

 

Web Title: Tension of eating with a fork and knife? These simple rules of table manners, now eat confidently ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.