Join us  

लहान बाळांसाठी ‘तिने’ मायेनं केलं आपलं दूध दान, महिलेचा जागतिक विक्रम-वाचले लेकरांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 6:36 PM

Texas Mother Sets Guinness World Record By Donating Over 2,600 Liters Of Breastmilk : आईचं दूध बाळासाठी अमृत असतं, एका महिलेनं आपलं दूध दान करत केला नवीन विक्रम

प्रत्येक महिलेसाठी आई होणं ही एक वेगळीच अनुभूती असते (Breastfeeding). आणि स्तनपान ही गोष्ट नैसर्गिक असली तरी सोपी नसते (Breastmilk). अनेक बाळांना नीट स्तनपान करता येत नाही तर काही बाळं अनेक कारणास्तव आईच्या दुधापासून वंचित राहतात (Guiness World Record).

आता जगभर स्तनदा मातांना दूध दान करण्याचे आवाहन करणारी चळवळ उभी राहते आहे. ज्या बाळांना आईचं दूध मिळत नाही त्यांना कुणा मातेचं दूध मिळावं म्हणून प्रयत्न केले जात आहे. तशीच ही एका महिलेची गोष्ट. अमेरिकास्थित एका महिलेनं आपल्या दुधातून अनेक बाळांना जीवनदान दिलं आहे(Texas Mother Sets Guinness World Record By Donating Over 2,600 Liters Of Breastmilk).

तिने केलेल्या समाजसेवेची दखल चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील घेतली आहे. तिने केलेल्या कार्यामुळे लोकांना मातृत्वाचं आणि वात्सल्याचं दर्शन घडलं आहे.  एलसी ओग्लीट्री असं या ३६ वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला नॉर्थ टेक्सास ब्रेस्ट मिल्क बँकशी संलग्न आहे. जुलै २०२३ पासून या महिलेने स्तनपानासाठी दूध दान करणं सुरु केलं. आणि यापूर्वी २०१४ सालापासून अस्तित्वात असलेला दूध दान करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. ज्यामुळे साडेतीन लाख बालकांना वाचवण्यासाठी मदत झाली आहे. तिने आजवर २६०० लिटर दूध दान केलं आहे.

तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा ४ चुका; मुलांच्या वाढीचा प्रश्न..

एलसीने २०१० साली एका मुलाला जन्म दिला. त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की बाळाचं पोट भरतं, आणि आपल्याला भरपूर दूधही येतं. याबद्दल ती म्हणते, 'आमचं पहिलं बाळ रुग्णालयामध्ये होतं. त्यावेळेस मला नर्सने विचारलं की तुम्ही दूध दान करू इच्छिता का? असं विचारलं. तेव्हा आईचं दूध दान करता येऊ शकतं, याची मला कल्पनाही नव्हती.'

पैश्यांसाठी नाही तर..

फक्त रुपच नाही नजरही होईल तेज, चमचाभर तूप ‘या’ पद्धतीने खा-बॅड कोलेस्टेरॉलही घटेल

एलसी दान करत असलेल्या दुधाचा फायदा, सरोगसीच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळांबरोबरच; आरोग्य विषयक समस्या असलेल्या बालकांनाही होतो. याबाबत एलसीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, 'मी यामधून पैसे कमवत नाही. चांगल्या कामासाठी पैसे घेण्याची गरजच नाही.’आपण दान करत असलेल्या दुधातून चिमुकल्यांना जीवनदान मिळत असल्याने आनंद होत असल्याचं एलसी सांगते. सध्या ती याबद्दल जनजागृती मोहीम राबवत असून, या माध्यमातून अधिक चिमुकल्यांना जीवनदान मिळावे असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ती दूध दान करते.

टॅग्स :गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसोशल मीडियासोशल व्हायरल