सध्या उबेर (Uber Auto) ओलाचा (Ola) जमाना आहे. आताच्या काळात पूर्वीसारखे आपल्याला रिक्षा, टॅक्सीला थांबवण्यासाठी हात दाखवायची गरज भासत नाही. कुठे बाहेर जायचा प्लॅन झालाच तर लगेच ऑनलाईन अॅपवरून आपण रिक्षा, टॅक्सी बुक करू शकतो. ऑनलाईन रिक्षा, टॅक्सी बुक केल्याने भाडं देण्यावरून होणारी घासाघीस, भांडण यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका उबेर जर्नीचा किस्सा व्हायरल होताना दिसत आहे.
बेंगळुरूच्या एका मुलीने तिची उबेर ऑटो (Uber Auto) बुक करतानाचा एक गमतीदार स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. तिने केलेले हे ट्विट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे ट्विट तिच्या उबेर अॅपचा स्क्रीनशॉट होता ज्यामध्ये असे दिसून आले आहे की तिची उबेर ऑटो राईड, ज्याची किंमत ४६ रुपये इतकी होत होती. ती फक्त तिने चक्क ६ रुपयांमध्ये बुक (Uber Auto Booked In Rs 6!) केली होती. नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या रहदारी असलेल्या शहरांमध्ये प्रवास करणे हे एक त्रासदायक, महाकठीण काम असते. अशा फार वर्दळ व गर्दीच्या ठिकाणी केवळ ६ रुपये इतक्या कमी किंमतीत तिचा प्रवास रिक्षाने झाला, त्यामुळेच या ट्विटने नेटिझन्सला मोठा धक्का बसला आहे('That's a bug everyone wants': Netizens react as Uber shows Rs.6 fare for a ride in Bengaluru).
उबेर ऑटो ६ रुपयांमध्ये बुक !!
अत्यंत कमी किमतीत उबेर राइड बुक केल्याच्या नुकत्याच घडलेल्या एका घटनेने नेटिझन्सला धक्का बसला आहे. राइड बुक करताना या बेंगळुरूच्या मुलीने तिच्या उबर अॅपचा एक स्क्रीनशॉट पोस्ट केला ज्यामध्ये तिने केलेले ऑटो बुकिंग दिसत आहे. या राईडची मूळ किंमत ४६.२४ इतकी होत होती, पण प्रोमो कोड लागू झाल्यानंतर ही किंमत ४० रुपयांनी कमी झाली आणि अंतिम भाडे फक्त ६.२४ रुपये इतके कमी झाले. या स्क्रिनशॉटनुसार, तिने सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी ही राइड बुक केली होती. सहसा सकाळची वेळ म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या लोकांची गर्दी असतेच. अशा गर्दीच्या वेळी तर उबेर राइडचे भाडे इतके कमी असेल यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे.
This has to be a bug pic.twitter.com/X2gyUCLLNU
— Mahima Chandak (@mahima_chandak) August 16, 2023
लिपस्टिक लावण्याची आलिया भटची अजब पद्धत, रणबीर कपूर म्हणाला पुसून टाक ते...
नेटकरी म्हणतात...
या मुलीचे ट्विट लगेच व्हायरल झाले आणि असंख्य नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी ही पोस्ट बघून धक्का व्यक्त केला तर काहींना हसू आवरता आले नाही. बर्याच वापरकर्त्यांनी भूतकाळातील त्यांचे स्वतःचे असेच अनुभव देखील शेअर केले. जिथे एकाने सांगितले की त्याच्या राइडची किंमत शून्य होती परंतु त्याला एकही ड्रायव्हर मिळाला नाही. तर दुसर्याने सांगितले की त्याने बुकिंग केलेल्या उबेरची राइड ही फ्री होती. देशभरातील वापरकर्त्यांसाठी हे धक्कादायक असताना, बेंगळुरूच्या रहिवाशांचा यावर विश्वासच बसत नव्हता. जणू ही त्या मुलीला लागलेली लॉटरीच आहे असे त्यांचे मत होते.