Join us  

जगात सर्वाधिक लांब केस असलेला १५ वर्षांचा मुलगा, एवढे लांब केस त्याने का आणि कसे वाढवले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 11:28 AM

15 Years old Teenager sidakdeep singh chahal Break Guinness World Records for having longest hair : हे केस धुवायला, वाळवायला आणि विंचरायला किमान १ तास लागतो.

केस वाढवणे, ते नियमित धुणे, वाळवणे आणि विंचरणे हे अतिशय जिकरीचे काम. हे सगळे करण्यात वेळ जाऊ नये म्हणून अनेक जण लहान केस ठेवण्याचाच निर्णय घेतात. पण काही जणांना केस वाढवण्याची इतकी जास्त आवड असेत की ते हट्टाने केस वाढवतातच. यामध्ये बहुतांशवेळा मुलींचे प्रमाण जास्त असते. पण हल्ली मुलेही केस वाढवण्यात मागे नाहीत. अगदी मानेवर येईपर्यंत किंवा पोनी टेल येईल इतके केस आजकाल मुलंही सर्रास वाढवताना दिसतात. हे ठिक आहे. पण एका मुलाने इतके लांब केस वाढवले की इतक्या कमी वयात सर्वात मोठे केल असल्याच्या कारणावरुन त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. आता त्याचे केस इतके कसे काय वाढले आणि त्याला ही केस वाढवण्याची आवड कशी निर्माण झाली हे समजून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे (15 Years old Teenager sidakdeep singh chahal Break Guinness World Records for having longest hair) . 

(Image : Google)

या मुलाचे नाव सिदकदिप सिंग चहल असे असून तो उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील आहे. त्याचे वय केवळ १५ वर्षे असून इतक्या लांब केसांबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जन्माला आल्यापासून या मुलाचे एकदाही केस कापलेले नसल्याने ते वाढतच राहीले आणि आता ते जमिनीवर लोळेपर्यंत मोठे झाले आहेत. जवळपास ४ फूट आणि ९.५ इंच लांबी असलेले हे केस पाहून कोणत्याही मुलीला त्याचा हेवा वाटेल. आपले केस लांब असावेत असे प्रत्येक मुलीला वाटते पण तसे ते वाढतातच असे नाही. काही ना काही कारणाने आपण वेळच्या वेळी केस कापण्यालाच प्राधान्य देतो. मात्र या मुलाने आणि त्याच्या पालकांनी अतिशय मेहनत घेऊन त्याचे केस वाढवायचे ठरवले आणि १५ वर्षात ते इतके जास्त लांब झाले. 

हे केस धुवायला, वाळवायला आणि विंचरायला किमान १ तास लागतो. आठवड्यातून २ वेळा आपण गी प्रक्रिया करतो. मात्र त्यासाठी आपल्याला बरेचदा आईची मदत घ्यावी लागते असे सिदकदिप यांनी सांगितले. आईची मदत नसेल तर केस आवरण्यात माझा पूर्ण दिवस जातो असेही तो म्हणाला. सिदकदिप या केसांचा आंबाडा बांधतो आणि शिख धर्मात ज्याप्रमाणे पगडीने बांधतात तसेच करतो. त्याच्या परीवारातील आणि मित्रमंडळींमधील कोणाचेच केस इतके लांब नाहीत. त्याचे केस इतके मोठे कसे झाले हे पाहून त्याच्या कुटुंबातील काही लोकांनाही खूप आश्चर्य वाटत असल्याचे तो सांगतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियागिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड