Lokmat Sakhi >Social Viral > थंडीत उत्तम थर्मल वेअर घेण्यासाठी ३ टिप्स, नाहीतर पैसेही जातील आणि थंडीतही कुडकुडाल..

थंडीत उत्तम थर्मल वेअर घेण्यासाठी ३ टिप्स, नाहीतर पैसेही जातील आणि थंडीतही कुडकुडाल..

The Best Thermals for Cold Weather : थंडीत उत्तम थर्मल वेअर कसे खरेदी करायचे? स्वस्तात मस्त आणि उबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 01:28 PM2023-12-24T13:28:13+5:302023-12-24T13:29:04+5:30

The Best Thermals for Cold Weather : थंडीत उत्तम थर्मल वेअर कसे खरेदी करायचे? स्वस्तात मस्त आणि उबदार

The Best Thermals for Cold Weather | थंडीत उत्तम थर्मल वेअर घेण्यासाठी ३ टिप्स, नाहीतर पैसेही जातील आणि थंडीतही कुडकुडाल..

थंडीत उत्तम थर्मल वेअर घेण्यासाठी ३ टिप्स, नाहीतर पैसेही जातील आणि थंडीतही कुडकुडाल..

आला थंडीचा महिना..हिवाळा सुरु झाला की घरातले एसी, फॅन बंद होतात. शरीर उबदार ठेवण्यासाठी आपण उबदार कपड्यांचा वापर करतो. काही लोकं नवीन उबदार कपडे खरेदी करतात, तर काही जुने स्वेटर्स, ब्लँकेट्सचा वापर करतात. शरीराचे थंडीपासून सरंक्षण करण्यासाठी आपण स्वेटर्स, ब्लँकेट्स, सॉक्स यासह थर्मल वेअरचा (Thermal Wear) वापर करतो. थर्मल वेअर आपण कपड्याच्या आत घालतो. जेणेकरून थंडी शरीरापर्यंत पोहचत नाही. सध्या थंडी वाढत चालली आहे, आणि ही थंडी फेब्रुवारीपर्यंत असते.

शरीराचे सरंक्षण करण्यासाठी जर आपल्याला स्वेटर्स, ब्लँकेट्चा वापर करायचं नसेल तर, थर्मल वेअरचा वापर करून पाहा. स्वेटर्स, ब्लँकेट्स वजनाने जड असतात. शिवाय कधी कधी ते कॅरी करणं अवघड होऊन जाते. जर आपल्याला बाहेरून स्टायलिश आणि थंडीपासून स्वतःचे सरंक्षण करायचं असेल तर, थर्मल वेअरचा वापर करून पाहा. पण थर्मल वेअर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या पाहूयात(The Best Thermals for Cold Weather).

थर्मल वेअर खरेदी करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या?

- थर्मल वेअर खरेदी करताना फॅब्रिक आणि फिटिंगकडे अधिक लक्ष द्या. आतील थर मऊ आणि बाहेरील थर वुलनचा असावा. थर्मल वेअरचा आतील थर ओलावा शोषून घेते. तर, बाहेरील थर उष्णता टिकवून ठेवते. शिवाय थर्मल वेअर खरेदी करताना ब्रॅण्डेड विकत घ्या.

- थर्मल वेअर खरेदी करताना त्वचेच्या प्रकारानुसार फॅब्रिक निवडा. तुम्हाला विशिष्ट ब्रॅण्ड किंवा फॅब्रिकमध्ये समस्या असल्यास इतर ब्रॅण्डचे थर्मल वेअर ट्राय करून पाहा.

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही कुबट वास येतो? ४ टिप्स, कपडे चकाचक, दुर्गंध गायब

- जर क्रीडाप्रेमी असाल तर, सामान्य थर्मल वेअर खरेदी करू नका. हाल्फ स्लिव्ह्जचे थर्मल वेअर खरेदी करा. जे कम्फर्टेबल असतील, शिवाय शरीराची हालचाल करताना कोणतीही अडचण येणार नाही.

थर्टी फस्ट घरीच साजरा करणार? ६ आयडिया, सेलिब्रेशन होईल यादगार, पार्टी होईल जबरदस्त

थर्मल वेअर वॉश करताना कोणती काळजी घ्यावी?

- थर्मल वेअर आपल्या शरीराला चिटकून राहते, त्यामुळे त्याच्या हायजीनची काळजी घ्यायला हवी. योग्य वेळेस स्वच्छ नाही केल्यास स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे थर्मल वेअरच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थर्मल वेअर धुताना गरम पाण्याचा वापर करू नका. यामुळे फॅब्रिक खराब होऊ शकते. फक्त थंड पाण्याचा वापर करा. शिवाय कडक उन्हात सुकवण्यासाठी ठेऊ नका.

Web Title: The Best Thermals for Cold Weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.