आपल्या घराप्रमाणेच आपण आपले बाथरुमदेखील तितकेच स्वच्छ ठेवतो. शक्यतो बाथरूममध्ये जास्त ओलावा असल्याकारणाने ते वेळीच स्वच्छ नाही केले तर कुबट वास येऊन दुर्गंधी पसरते. ओले बाथरूम तसेच ओले ठेवले असता, बाथरूममधील काही वस्तूंना बुरशी लागू शकते. बाथरुम मधील सततच्या ओलाव्यामुळे गिझर, हॅन्ड शॉवर, नळ किंवा इतर उपकरण किंवा वस्तू लगेच खराब होऊ शकतात. असे होऊ नये म्हणून आपल्याला बाथरूमच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते.
बाथरूमच्या टाईल्स, बेसिन, टॉयलेट सीट इतर गोष्टी तर आपण रोज स्वच्छ करतो. असे असले तरीही ओलाव्यामुळे किंवा अधिक आर्द्रतेमुळे बाथरूममधील नळ , शॉवर किंवा इतर वस्तूंवर गंज चढतो. या काही वस्तूंवर गंज चढल्याने त्या वापरण्यायोग्य राहत नाही किंवा लवकर खराब होतात. (4 Simple Ways to Remove Rust from Your Bathroom Shower Head) जेव्हा आपल्या शॉवर हेडमध्ये गंज लागून खराब होतो तेव्हा त्यातून येणाऱ्या पाण्याला एक प्रकारची दुर्गंधी येते. अशावेळी या पाण्याने आंघोळ करणे नकोसे वाटते. बाथरुममधील रोजच्या वापरात येणारा शॉवर गंजून खराब होऊ नये किंवा त्यावर लागलेला गंज काढण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूयात(The Best Way To Remove Rust From Your Shower And Showerhead).
शॉवर वर चढलेला गंज सहजपणे काढून टाकण्यासाठी उपाय...
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये ३ ते ४ टेबलस्पून व्हिनेगर घेऊन त्यात २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस घालावा. त्यानंतर हे मिश्रण किंचितसे हलके गरम करून घ्यावे. आता हे तयार मिश्रण शॉवर वर ज्या ठिकाणी गंज चढला आहे, त्या भागांवर लावून घ्यावे. आता हे मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवून द्यावे. १० मिनिटांनंतर, सॅण्ड पेपरने किंवा टूथब्रशने शॉवर शेड व्यवस्थित स्क्रब करून घ्यावे. त्यानंतर कोरड्या कापडाने हे पुसून घ्यावे.
कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...
२. दुसरा उपाय करताना, आपण यात व्हिनेगर व बेकिंग सोड्याचा वापर करू शकतो. शॉवरच्या हेडवर ज्या ज्या भागात गंज चढला आहे. त्या भागांवर १ ते २ टेबलस्पून बेकिंग सोडा शिंपडावा. बेकिंग सोडा घातल्यानंतर ५ मिनिटांसाठी तसाच राहू द्यावा त्यानंतर त्यावर व्हिनेगर घालावे आणि सॅण्ड पेपरने स्क्रब करून घ्यावे. बेकिंग सोडा गंज असलेल्या भागांवर घातल्याने गंज क्रिस्टल्स ऍक्टिव्हेट होतात आणि व्हिनेगर अगदी वेगाने गंज साफ करतो.
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
३. एका मोठ्या बाऊलमध्ये चुना पावडर, व्हिनेगर, बेकिंग सोडा घालून त्याची घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट शॉवर हेडच्या गंजलेल्या भागावर लावून घ्यावी. त्यानंतर ५ ते १० मिनिटे ही पेस्ट तशीच राहू द्यावी. आता स्क्रबर किंवा सॅण्ड पेपरच्या मदतीने हा गंज घासून शॉवर हेड स्वच्छ करून घ्यावे.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...
४. शॉवर हेडवरील गंज साफ करण्यासाठी आपण इतर अनेक गोष्टीचा देखील वापर करु शकता. यासाठी ब्लीच पावडर आणि व्हिनेगर यांचा देखील वापर करु शकता. हायड्रोजन पेरोक्साईड लिक्विड आणि बेकिंग सोडा वापरल्याने कोणत्याही लोखंडी वस्तूवरील गंज सहजपणे साफ करता येतो.
हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...