स्वयंपाकघरात खरकटी भांडी, अन्नकण पडलेले असले की लगेच झुरळं तयार होतात. कितीही स्वच्छता ठेवली तरी झुरळांचा स्वयंपाकघरातला वावर वाढतच जातो. या झुरळांना पळवून लावण्यासाठी अनेक उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. पण केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या संपर्कात आल्यानं तब्येतीचे गंभीर आजार होऊ शकतात. झुरळांना पळवून लावण्याच सोपे उपाय पाहूया. (The Best Ways to Get Rid of Cockroaches in Your Home)
लवंग गरम करून ज्या ठिकाणी झुरळं येतात त्या ठिकाणी ठेवा. खासकरून फ्रिजच्या रबरमध्ये झुरळं जास्त अडकतात. फ्रिजच्या दाराच्या रबरमध्ये बारीक झुरळं लपलेली असतात. अशा ठिकाणी लवंग ठेवल्यास किंवा लंवगाच्या पाण्याच्या स्प्रे मारल्यास झुरळं जागच्याजागी नष्ट होतील किंवा दूर पळतील.
तमालपत्र
जर तुम्हाला झुरळांना न मारता यापासून कायमची सुटका करायची असेल, तर तमालपत्र तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकते. यासाठी तमालपत्र बारीक करून पावडर बनवा किंवा गरम पाण्यात उकळा. आता ज्या ठिकाणी तुम्हाला झुरळे दिसतात त्या ठिकाणी शिंपडा.
कडुनिंब
कडुनिंब एक किटकनाशक आहे. झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही कडुनिंबाची पानं वापरू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी झुरळांच्या लपण्याच्या जागेवर कडुनिंब पावडर किंवा त्याचे तेल शिंपडा. यामुळे झुरळ त्याच्या वासापासून कायमचे पळून जातात.
लवंग
लवंगाचा सुगंध खूप तीव्र असतो. त्यामुळे कीटक त्याच्या जवळ येणे टाळतात. अशा स्थितीत जर तुमच्या घरात झुरळांची दहशत निर्माण होत असेल तर तुम्ही लवंग वापरू शकता. यासाठी फक्त झुरळांच्या ठिकाणांजवळ काही लवंगा ठेवाव्या लागतील. झुरळं अशावेळी वाढतात जेव्हा त्यांना खायला अन्नाचे कण मिळतात. अशात सिंकमध्ये जास्तवेळ उष्टी भांडी पडली असतील तर वेळीच साफ-सफाई करा. किचन आणि फ्लोरवर अन्नाचे कण पडलेले राहू देऊ नका.