जोडीदारांमध्ये ज्याप्रमाणे प्रेम असते त्याचप्रमाणे भांडणेही होतात. मात्री हे गणित कुठे, कधी आणि कसे काय बिनसेल आपण सांगू शकत नाही. भांडणाशिवाय नात्यात मजा नाही असे जरी आपण म्हणत असलो तरी ती जास्त प्रमाणात होत असतील तर त्याचा सगळ्यांनाच त्रास होतो. भांडणांमुळे या जोडीदारांचे आयुष्य तर अस्थिर होतेच पण अनेकदा या भांडणांचा दुसऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. नुकतीच अशीच एक घटना घडली आणि त्यामुळे चक्क पायलटला (EasyJet) विमानाची दिशा बदलून विमान लँड करण्याची वेळ आली. आता असे काय झाले की पायलटला आणि विमान कंपनीच्या तांत्रिक टीमला इतका मोठा निर्णय घ्यावा लागला (Couple drunk in airplane pilot diverted flight in other country).
हँगर लग रही हो! -अभिनेत्री क्रिती सेननलाही ‘कुछ भी नहीं’ म्हणत ऑनलाइन छळणाऱ्या ट्रोलवृत्तीचं काय?
तर, इंग्लंडमधील लिवरपूल याठिकाणी ही घटना घडली असून प्रमाणापेक्षा जास्त दारु प्यायलेल्या एका जोडप्याने विमानात खूप धिंगाणा घातला. आपण आपल्या आजुबाजूला दारुच्या नशेत कधी बरळणारी तर कधी आदळ-आपट करणारे लोक पाहिले असतील. आता जमिनीवर असे सगळे ठिक आहे. पण चक्क हवेत उडणाऱ्या विमानात या कपलने बराच धिंगाणा केल्यामुळे पायलटला विमानाचा रुट बदलत विमान दुसऱ्या विमानतळावर उतरवावे लागले. ६ जुलै रोजी EasyJet या कंपनीचे विमान लिवरपूल येथून टेनरिफ याठिकाणी जात होते. विमानाचे उड्डाण झाले तसे एका कपलने आपल्या सीटच्या बाजूला उभे राहत दारु प्यायला सुरुवात केली. त्यांचे असे वागणे पाहून विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अशाप्रकारे चालू विमानात दारु न पिण्याच्या आणि सिगारेट न ओढण्याच्या सूचना द्यायला सुरुवात केली. वारंवार सूचना देऊनही या जोडप्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आपले काम चालूच ठेवले. त्यानंतर या दोघांनी विमानातील स्वच्छतागृहामध्ये जाऊन सिगारेट ओढली.
विमानातील काही प्रवाशांनीही त्यांना असे करु नका असे वारंवार सांगितले. मात्र त्यांनी कोणाचेच न ऐकता सगळे सुरूच ठेवले. १० ते १५ मिनीटे हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर पायलटने आपण विमान लिस्बनच्या विमानतळावर उतरवत असल्याचे जाहीर केले. पालटने केलेली ही घोषणा ऐकल्यावर तर या कपलने विमानाच्या दरवाजांवर लाथा मारण्यास आणि जास्त हंगामा करायला सुरूवात केली. लिस्बन विमानतळावर या जोडप्याला विमानातून खाली उतरवण्यात आले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण केले आणि ठरलेल्या वेळेच्या १.५ तास उशीराने हे विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. या विमानातील अनेक प्रवासी आपल्या सुट्ट्या सेलिब्रेट करण्यासाठी जात होते मात्र त्यांना या सगळ्या परिस्थितीमुळे विनाकारण उशीर झाला. मात्र पायलट आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी या जोडप्याला विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आणि सुरक्षितरित्या इतर प्रवाशांना निश्चित ठिकाणी पोहोचवल्याने विमानाचे लँडींग झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवत आनंद साजरा केला.