Lokmat Sakhi >Social Viral > वडील घरी आल्याचं कळताच कुत्र्याने मुलीला दिला असा इशारा, विश्वास बसत नाही पाहा व्हिडिओ...

वडील घरी आल्याचं कळताच कुत्र्याने मुलीला दिला असा इशारा, विश्वास बसत नाही पाहा व्हिडिओ...

Social Viral Video ही दोस्ती पाहून कुत्र्याची इमानदारी पुन्हा सिद्ध झाली. कुत्रा आणि मुलीचे बॉण्डिंग पाहून नेटकरी अवाक झालेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 10:44 PM2022-12-19T22:44:33+5:302022-12-19T22:45:36+5:30

Social Viral Video ही दोस्ती पाहून कुत्र्याची इमानदारी पुन्हा सिद्ध झाली. कुत्रा आणि मुलीचे बॉण्डिंग पाहून नेटकरी अवाक झालेत.

The dog alerted the girl as soon as the father came home, you can't believe it, watch the video... | वडील घरी आल्याचं कळताच कुत्र्याने मुलीला दिला असा इशारा, विश्वास बसत नाही पाहा व्हिडिओ...

वडील घरी आल्याचं कळताच कुत्र्याने मुलीला दिला असा इशारा, विश्वास बसत नाही पाहा व्हिडिओ...

कुत्रा हा प्राणी अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार प्राण्यांपैकी एक मानला जातो. हे वाक्य अनेक घटनेतून स्पष्ट देखील झाले आहे. पाळीव प्राणी आपल्या मालकाची सेवा करतात, त्यांच्या घराचे संरक्षण करतात. हळू हळू कुत्र्याची घरातल्या व्यक्तींसह घट्ट मैत्री जमते. कुत्र्याचे आणि घरातल्या व्यक्तींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. सध्या एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आला आहे. ज्यात पाळीव कुत्र्याचं आणि एका लहानग्या मुलीचे बॉण्डिंग पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं घडलं काय पाहुयात..

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी टीव्ही पाहत असते. तिच्यासमोर काही पुस्तके असतात. यासह तिच्या बाजूला त्यांचा पाळीव कुत्रा देखील असतो. त्याचवेळी तिचे वडील घरी येत असल्याचं पाळीव कुत्र्याला समजतं. त्यानंतर कुत्रा तातडीनं त्या चिमुकलीला इशारा करुन टीव्ही बंद करण्यासाठी सांगतो. मुलीलाही कुत्र्यावर पूर्ण विश्वास असल्याने ती लगेच टीव्ही बंद करते आणि अभ्यास करायला सुरुवात करते. हे सुंदर दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

@yoda4ever नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत "पॉटनर्स इन क्राईम" असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर गाजला असून ५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

Web Title: The dog alerted the girl as soon as the father came home, you can't believe it, watch the video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.