कुत्रा हा प्राणी अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार प्राण्यांपैकी एक मानला जातो. हे वाक्य अनेक घटनेतून स्पष्ट देखील झाले आहे. पाळीव प्राणी आपल्या मालकाची सेवा करतात, त्यांच्या घराचे संरक्षण करतात. हळू हळू कुत्र्याची घरातल्या व्यक्तींसह घट्ट मैत्री जमते. कुत्र्याचे आणि घरातल्या व्यक्तींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. सध्या एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आला आहे. ज्यात पाळीव कुत्र्याचं आणि एका लहानग्या मुलीचे बॉण्डिंग पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं घडलं काय पाहुयात..
या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी टीव्ही पाहत असते. तिच्यासमोर काही पुस्तके असतात. यासह तिच्या बाजूला त्यांचा पाळीव कुत्रा देखील असतो. त्याचवेळी तिचे वडील घरी येत असल्याचं पाळीव कुत्र्याला समजतं. त्यानंतर कुत्रा तातडीनं त्या चिमुकलीला इशारा करुन टीव्ही बंद करण्यासाठी सांगतो. मुलीलाही कुत्र्यावर पूर्ण विश्वास असल्याने ती लगेच टीव्ही बंद करते आणि अभ्यास करायला सुरुवात करते. हे सुंदर दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
@yoda4ever नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत "पॉटनर्स इन क्राईम" असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर गाजला असून ५ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.