Join us  

सणावाराला सतत वापरुन काळीकुट्ट, चिकट झालेली धुपदाणी करा स्वच्छ, १ सोपी युक्ती, फारशी मेहेनत करावी लागणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2024 1:52 PM

The Easiest Way to Clean Oily, Black Stains From Dhoopdani : How to remove oil stains from dhoopdani : Dhoop stand cleaning tips : धुपदाणीत सतत धूप घालत राहिल्याने त्यावरील काळाकुट्ट, चिकट साचलेला थर निघेल झटपट...

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे एकामागोमाग येणारे सण आपण अगदी आनंदाने साजरे करतो. सणांदरम्यान घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न, प्रफुल्लित राहावे यासाठी आपण अनेक उपाय करतो. घरात वेगवेगळ्या प्रकारे फुलांची सजावट, दिव्यांची आरास करतो. याचबरोबर, घरातील वातावरण प्रसन्न व धार्मिक राहावे यासाठी आपण सुवासिक धूप, कापूर प्रज्वलित करतो. यासाठी आपण शक्यतो धुपदाणीचा वापर करतो. धुपदाणीमध्ये आपण धूप, कापूर किंवा नारळाच्या करवंट्या प्रज्वलित करुन धूप घालतो. सणांना विशेष पूजाअर्चा,आरत्या करताना आपण धुपदाणीमध्ये धूप घालतो. घरात काही खास पूजाविधी असेल किंवा सणांना या धुपदाणीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो(Dhoop stand cleaning tips).

धुपादाणी सतत बराचकाळ वापरल्याने ती आतून काळीकुट्ट तर होतेच, शिवाय तेल, तुपाचा वापर केल्याने चिकट देखील होते. अशावेळी ही चिकट, काळीकुट्ट धुपदाणी स्वच्छ करणे म्हणजे फारच कठीण होते. धुपदाणीत (How To Clean Puja Utensils at Home) सतत धूप घालत राहिल्याने त्यावरील काळाकुट्ट साचलेला थर काढून टाकण्यासाठी फार मेहेनत घ्यावी लागते.अशा परिस्थितीत, आपण ही धुपदाणी अनेकवेळा साबण, लिक्विड डिशवॉश, स्क्रब यांच्या मदतीने घासतो, परंतु हा काळाकुट्ट, चिकट थर इतक्या सहजासहजी जात नाही. अशावेळी धुपदाणी (The Easiest Way to Clean Oily, Black Stains From Dhoopdani ) स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात. या ट्रिकचा वापर केल्याने अगदी कमी वेळात फारशी मेहेनत न घेता आपली धुपदाणी पुन्हा पहिल्यासारखी स्वच्छ होईल(How to remove oil stains from dhoopdani).

धुपदाणीतील काळाकुट्ट, चिकट थर काढून टाकण्यासाठी... 

धुपदाणीत काळाकुट्ट, चिकट थर साचून राहून तो सहजासहजी निघत नाही. अशावेळी हा काळाकुट्ट, चिकट थर काढून टाकण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय नक्की ट्राय करुन पहा. 

यासाठी धुपदाणीत प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, बेकिंग सोडा आणि गरम पाणी घालावे. त्यानंतर याच मिश्रणात २ ते ३ टेबलस्पून व्हिनेगर घालावे. हे सगळे मिश्रण धुपदाणीत १ तास आहे तसेच ठेवून द्यावे. 

दिवाळीत नवीन झाडूची खरेदी केली, झाडूचा भुसा पडू नये म्हणून ४ उपाय, जराही भुसा पडणार नाही...

१ तासानंतर या धुपदाणीत भांडी घासण्याचे डिशवॉश लिक्विड सोप घालावे. त्यानंतर तारांची घासणी किंवा स्क्रबरच्या मदतीने धुपदाणी स्वच्छ घासून घ्यावी.  घासणी किंवा स्क्रबरने धुपदाणी वरील सगळे काळे डाग घासून घ्यावेत. 

भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!

हा झटपट सोपा उपाय केल्याने धुपदाणीवरील काळेकुट्ट, चिकट डाग अगदी सहज निघून जातील. यामुळे धुपदाणी स्वच्छ करण्यासाठी फारशी मेहेनत न घेता देखील धुवून पुन्हा नव्यासारखी स्वच्छ होईल.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सदिवाळी 2024दिवाळीतील पूजा विधी