Join us  

सुईत धागा ओवायचा तर चटकन जमत नाही? ५ ट्रिक्स, एका सेकंदात काम करा फत्ते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 2:29 PM

Great tips & tricks to thread a needle : The Easiest way to Thread a Needle : Tips and Tricks to Help You Thread A Needle : सुईत धागा ओवायचे काम झाले सोपे, वापरा या ५ ट्रिक्स, वेळ वाया न जाता काम होईल झटपट...

सुई आणि धागा यांचे पूर्वीपासूनच अतूट नाते आहे. कोणतंही कापड शिवायचं म्हटलं किंवा फुलांचा हार, गाजरा ओवायचा म्हटलं की सुई धागा लागतोच. सुई धाग्याचा वापर करुन आपण घरातील इतर छोटी मोठी काम अगदी पटकन चुटकीसरशी करु शकतो. सुई आणि धागा यातील एक जरी नसेल तरी आपले काम होऊच शकत नाही. असे असले तरीही सुईत धागा ओवायचा म्हणजे महाकठीण आणि सगळ्यात किचकट काम(The Easiest way to Thread a Needle).

सुईत धागा ओवताना आपण कित्येकदा बराच वेळ असाच वाया घालवतो. काहीवेळा तर या एकदम सोप्या आणि इवलुशा वाटणाऱ्या कामासाठी आपण तासंतास खर्ची करतो. एवढा वेळ वाया घालवूनही काहीवेळा आपल्याला सुईत धागा ओवता येत नाही, अशावेळी आपल्याला इतरांची मदत घ्यावीच लागते. सुईत धागा ओवण्याचे काम अगदी पटकन करता आले असते तर असा विचार आपल्या मनात येतो. अशा परिस्थितीत, आपण काही सोप्या ट्रिक्स समजून घेऊ शकतो. या साध्यासोप्या ट्रिक्सचा वापर करुन आपण पटकन सुईत धागा ओवू शकतो. या ट्रिक्स वापरल्या तर सुईत धागा ओवताना आपल्याला डोळे बारीक करून तासंतास सुईत धागा ओवण्यासाठी प्रयत्न करत बसावे लागणार नाहीत(Tips and Tricks to Help You Thread A Needle).

सुईत धागा ओवण्याच्या साध्यासोप्या ट्रिक्स... 

१. सुईत धागा ओवण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर करु शकता. यासाठी बोटावर थोडीशी टूथपेस्ट घेऊन ती धाग्याच्या टोकाशी लावून घ्यावी त्यानंतर १ ते २ मिनिटांसाठी ही टूथपेस्ट पूर्णपणे सुकू द्यावी. टूथपेस्ट पूर्णपणे सुकली की धाग्याचे टोक थोडे कडक आणि सरळ होईल. त्यानंतर सुई हातात घेऊन टूथपेस्ट लावलेल्या भागाकडून हा धागा ओवून घ्यावा.   

२. आपल्या घरात कायम नेलपॉलीश असतात. याच नेलपॉलीशचा वापर करुन आपण अगदी चटकन सुईत धागा ओवू शकतो. यासाठी धाग्याच्या टोकावर थोडेसे नेलपॉलीश लावून घ्यावे. त्यानंतर थोडा वेळ ते नेलपॉलिश संपूर्णपणे सुकू द्यावे. जेव्हा ते धाग्यावर लावलेले नेलपॉलीश संपूर्ण सुकेल तेव्हा तो धागा थोडा कडक होईल. असा धागा सुईत पटकन ओवला जातो. अशाप्रकारे आपण नेलपेंट्चा वापर करुन जास्त कष्ट न घेता चटकन सुईत धागा ओवु शकता. 

शाळेच्या युनिफॉर्मवर रोज शाईचे डाग? मुलांना ओरडण्यापेक्षा करा २ सोप्या टिप्स, युनिफॉर्म दिसेल नव्यासारखा...

३. ज्या लोकांची दृष्टी कमकुवत असते त्यांना सुईत धागा ओवण्यास खूप मेहेनत घ्यावी लागते. अशावेळी टूथब्रशचा वापर करून आपण सुईत धागा ओवु शकता. यासाठी एक जुना टूथब्रश घेऊन ज्या ठिकाणी टूथब्रशचे केस आहेत त्या भागावर धाग्याचे टोक ठेवून द्यावे त्यानंतर सुई घेऊन अलगद धागा ठेवला आहे त्या भागावर दाबून थोडी घासावी. या ट्रिकमुळे सुईत धागा पटकन ओवला जातो. 

४. जो धागा सुईत ओवायचा आहे तो धाग्याचा भाग कात्रीने व्यवस्थित कापून घ्यावा. त्यानंतर त्या कापलेल्या भागावर थोडेस पाणी लावून तो धाग्याचा भाग किंचित ओला करुन घ्यावा . धागा ओला करुन घेतल्यानंतर बोटांच्या मदतीने त्याला हलकेच पीळ द्या, असा धागा सुईत पटकन ओवला जाईल. धागा पाण्यात भिजवल्याने धाग्यातील विखुरलेले तंतू पुन्हा एकत्र येण्यास मदत होते.अनेकवेळा बाहेर पडलेल्या तंतूंमुळे धागा सुईत घालण्यात अडचण येते. अशा प्रकारे तुम्ही चष्मा न लावता देखील सुईमध्ये धागा घालू शकता.  

चाकू - सुऱ्या गंजल्या, धार नाही ?  २ सोप्या ट्रिक, गंज निघून चाकू - सुऱ्या होतील धारदार... 

५. सुईत धागा ओवण्यासाठी भांडी घासायची जी अ‍ॅल्युमिनियम तारांची घासणी येते त्याचा देखील आपण वापर करु शकतो. यासाठी या अ‍ॅल्युमिनियम तारांच्या  घासणीमधून एक तार काढून घ्यावी. आता ही तार सुईत ओवून घ्यावी. सुईत तार ओवाल्यांनंतर या तारेच्या एका बाजूला थोडासा पीळ देऊन ते टोक थोडेसे वाकवून घ्यावे या टोकात आपला धागा अडकवून घ्यावा. त्यानंतर दुसऱ्या बाजूने खेचून ही अ‍ॅल्युमिनियम तार बाहेर काढून घ्यावी. अशाप्रकारे आपण सहजपणे सुईत चटकन धागा ओवु शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरल