चहाची किटली हे सर्वसामान्य घरांमध्ये दिसून येणारं अगदी साधारण स्वरुपाचं भांडं. बऱ्याचदा तर त्यातला चहा आवडीने प्यायला जातो आणि तो चहा गरमागरम ठेवणाऱ्या किटलीकडे मात्र सर्रास दुर्लक्ष केलं जातं. आता आपल्या सर्वसामान्यांच्या विचार क्षमतेनुसार ही किटली महागात महाग म्हणजे फार फार तर हजार रुपये, किंवा अगदीच डोक्यावर पाणी म्हणजे १० हजार रुपयांना असून शकेल, असा आपला अंदाज. पण एन. सेठीया फाउंडेशनच्या मालकीची असलेली ही चहाची किटली तब्बल २४ करोड रुपयांची आहे. जगातली सगळ्यात महागडी चहाची किटली म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिची नोंद घेण्यात आली असून 'The Egoist' असं तिचं नाव आहे (Most valuable tea pot). आता बघूया या किटलीची नेमकी खासियत तरी काय....(The Egoist tea pot worth rupees 24 crore)
गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार इंग्लंड येथील एन. सेठीया फाउंडेशन आणि Newby Teas of London यांच्या संयुक्त विद्यमाने ही किटली तयार करण्यात आली आहे.
आलिया- करीनाची फिटनेस ट्रेनर सांगतेय एन्झायटी कमी करण्याचा खास उपाय, मनावरचा ताण होईल कमी
या किटलीची किंमत तब्बल 30 लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सांगायचं झाल्यास अंदाजे २४ करोड रुपये एवढी आहे. रेकॉर्डनुसार ही किटली २०१६ मध्ये बनविण्यात आली आहे.
'The Egoist' किटलीची खासियतगिनीज वर्ल्ड रेकॉर्डस यांच्या माहितीनुसार हा टी- पॉट फुलव्हिओ स्काविया Fulvio Scavia या इटालियन ज्वेलरने तयार केलेला आहे. किटलीवर 18 कॅरेटचं सोनं आणि शुद्ध चांदी लावण्यात आली आहे.
रात्री लवकर झोप येत नाही? ५ योगासनं करून बघा, शांत झोप लागेल, मनही होईल शांत
किटलीच्या आतल्या भागातही पुर्णपणे साेन्याचाच वापर करण्यात आला आहे. किटलीचं हॅण्डल सोन्याचं असून त्यावर आयव्हाेरी रंगाचा मुलामा दिला आहे. किटलीच्या वरच्या भागावर थोडेथोडके नाही तर तब्बल १६५८ हिरे जडविण्यात आले आहेत आणि तिच्या मधोमध मोठ्या आकाराचा थाई रुबी म्हणजेच माणिक आहे. किटलीच्या झाकणावरही माणिक असून किटलीमध्ये वापरण्यात आलेल्या एकूण माणिकांची संख्या तब्बल ३८६ एवढी आहे.