Lokmat Sakhi >Social Viral > आजारी आईला बरं वाटावं म्हणून वृद्ध लेकानं गाणं गात धरला ठेका; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

आजारी आईला बरं वाटावं म्हणून वृद्ध लेकानं गाणं गात धरला ठेका; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

The Elderly Son Danced Front Of His Mother : आपल्या आजारी आईसाठी वृध्द लेकानं गाण्याचा ताल धरला, मायलेकाचं हे प्रेमळ नातं पाहून अनेकजण गहिवरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 06:41 PM2022-06-10T18:41:25+5:302022-06-10T18:57:55+5:30

The Elderly Son Danced Front Of His Mother : आपल्या आजारी आईसाठी वृध्द लेकानं गाण्याचा ताल धरला, मायलेकाचं हे प्रेमळ नातं पाहून अनेकजण गहिवरले.

The elderly son danced and sang a song in front of his mother people said children never grow old | आजारी आईला बरं वाटावं म्हणून वृद्ध लेकानं गाणं गात धरला ठेका; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

आजारी आईला बरं वाटावं म्हणून वृद्ध लेकानं गाणं गात धरला ठेका; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

मूलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती लहान पाखरंच असतात. आई  कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांवर प्रेम करते. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या आईला बरं वाटावं म्हणून गाण गात ठेका धरताना दिसत आहे. (The Elderly Son Danced Front Of His Mother )  

वृद्ध माणसाची आई आपल्या मुलाला आशीर्वाद देत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ संजय कुमार नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.  

 याला म्हणतात प्रेम! गजबजलेल्या मेट्रोत बायकोसोबत सेल्फी घेण्यासाठी काकांची धडपड; पाहा व्हिडिओ

आईसाठी ते गृहस्थ मनापासून गाणं म्हणाले आणि आई खुशही झाली. या व्हिडिओला 85 हजारांहून अधिक लोकांचे लाईक्स आले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे- मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी लहानच असतात.

Web Title: The elderly son danced and sang a song in front of his mother people said children never grow old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.