बदलत्या काळानुसार आपल्याला देखील अपडेट होणं गरजेचं आहे. सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. प्रत्येक जण सोशल मीडियात सक्रीय आहे. आपण सोशल मीडियात कधी व्हायरल होऊ हे सांगता येत नाही. काही जण चांगले काम करून व्हायरल होतात, तर काही जण येडा गबाळ्याचे व्हिडिओ पोस्ट करून ट्रोल होतात. तर काहींकडून नकळत चुका होतात, ज्यामुळे त्यांचा व्हिडिओ काही दिवसात व्हायरल होतात. सध्या अशाच एकीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यात त्या महिलेचा सेल्फीसाठी पोझ देत असताना हात थोडक्यात बचावला आहे.
आतापर्यंत सेल्फी घेणं अनेकांना महागात पडलं आहे, आणि पुन्हा एकदा या व्हिडिओद्वारे सिद्ध झाले आहे (Social Viral). जर आपण देखील रेल्वे ट्रॅकवर उभे राहून सेल्फी काढत असाल तर, काळजाचा ठोका चुकावणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच(The horrifying moment woman taking selfie is hit by train).
झोपण्यापूर्वी दुध पिताय? नुसते दूध बाधू शकते, १ चिमूटभर गोष्ट घाला; वाढेल प्रतिकारशक्ती
नक्की प्रकरण काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही महिला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला उभे आहेत. जेव्हा ट्रेन त्यांच्या दिशेने येते, तेव्हाच महिलांनी ट्रेन येत असल्याचं पाहिलं. मात्र तरीही या पाठिमागे गेल्या नाहीत. उलट तिथेच त्या सेल्फी घेण्यासाठी उभ्या राहिल्या. यावेळी त्यातल्या एका महिलेने सेल्फी कॅमेरानं व्हिडीओ घ्यायला सुरुवात केली. व्हिडिओ शूट करत असतानाच मागून वेगाने ट्रेन येते. त्यांना ट्रेन आणि त्यांच्यातला अंतर काही लवकर कळालं नाही. यामध्ये सेल्फी घेणारी महिला बचावली मात्र, तिथे उभी असलेल्या महिलेच्या हाताला ट्रेनची जोरदार धडक बसली.
मनी प्लांट पाण्यात लावावा की मातीत लावणं योग्य? मनी प्लांट भरपूर वाढायचा तर..
ती महिला थोडक्यात बचावली असून, तिला गंभीर दुखापत झालेली नाही. त्यामुळे सेल्फी घेताना आजूबाजूचा परिसर, शिवाय सेल्फीमुळे आपला की इतर कोणाला दुखापत होणार नाही, हे पाहूनच सेल्फी काढा.