Lokmat Sakhi >Social Viral > नाटकात काम करतो आहोत हेच चिमुकली विसरली.. आणि.. सहकलाकार घाबरले.. पाहा व्हायरल व्हिडिओ

नाटकात काम करतो आहोत हेच चिमुकली विसरली.. आणि.. सहकलाकार घाबरले.. पाहा व्हायरल व्हिडिओ

Social Viral Video नाटक सुरू असतानाच चिमुकलीची निरागस कृती व्हायरल. नेमकं काय घडलं पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 01:32 PM2022-12-22T13:32:20+5:302022-12-22T13:34:52+5:30

Social Viral Video नाटक सुरू असतानाच चिमुकलीची निरागस कृती व्हायरल. नेमकं काय घडलं पाहा

The little girl forgot that she was acting in a drama.. and.. her co-stars got scared.. Watch the viral video | नाटकात काम करतो आहोत हेच चिमुकली विसरली.. आणि.. सहकलाकार घाबरले.. पाहा व्हायरल व्हिडिओ

नाटकात काम करतो आहोत हेच चिमुकली विसरली.. आणि.. सहकलाकार घाबरले.. पाहा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर लहान मुलांची निरागसता प्रचंड व्हायरल होते. ज्याला नेटकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. लहान मुलांमधील निरागसता पाहून आपले मन प्रसन्न होते. असेच मन जिंकणाऱ्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाताळवर नाटक सुरू असते. हे नाटक काही लहान मुलं सादर करत आहे.

यावेळी नाटकाचा भाग म्हणून येशू ख्रिस्त यांचे बालपणातील रूप दाखवणारा एक बाहुला ठेवण्यात आला आहे. सगळे लहान मुलं बाहुल्याच्या जवळ जमतात. मात्र, एक चिमुकली बाहुल्याला घेऊन असे काही करून जाते, की ते दृश्य पाहून सर्वांना हसू अनावर होते.

या व्हायरल व्हिडिओमध्ये काही लहान मुलं नाताळवर आधारित नाटक सादर करीत आहे. नाटक चांगले चालले असताना मध्येच एक चिमुकली येशू ख्रिस्त यांचा बालपणीचा रूप दर्शवणारा  बाहुला उचलते. ती त्या बाहुल्याला गोंजारते, गोल - गोल फिरवते. जणू आई आपल्या बाळाचे लाड करते. हे पाहून आधी सर्वजण अचंबित होतात पण नंतर या मुलीची निरागसता पाहून सर्वजण हसू लागतात. स्टेजवरील इतर मुलं तिच्याकडुन बाहुला परत मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण ती त्यांना विरोध करत खेळणं सुरूच ठेवते.

तिची ही निरागसता पाहून त्या मुलीचं कौतुक करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला २७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title: The little girl forgot that she was acting in a drama.. and.. her co-stars got scared.. Watch the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.