उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला थंड पदार्थ किंवा पेय पिण्याची प्रचंड इच्छा होते (Social Viral). काही लोक आठवड्यातून एकदा तरी आईस्क्रीम खातात. आईस्क्रीमचे अनेक प्रकार आहेत. व्हॅनिला, मँगो, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, यासह अनेक फ्लेवर्सची आईस्क्रीम बाजारात मिळते (Gutka Icecream). सध्या तवा आईस्क्रीमचा ट्रेण्ड सुरु आहे (Viral Video). आईस्क्रीममध्ये बऱ्याच फ्लेवर्स मिसळून आईस्क्रीम तयार केली जाते. पण आपण कधी गुटखा आईस्क्रीम खाऊन पाहिली आहे का?
आता तुम्ही म्हणाल हे काय विचित्र प्रकार? सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ भन्नाट व्हायरल होत आहे. तवा आईस्क्रीम विक्रेता, आईस्क्रीममध्ये गुटखा मिक्स करून विकत आहे. त्याची आईस्क्रीम तयार करण्याची ही पद्धत विचित्र आहेच, पण हा खरेदी करणारा ग्राहक कोण? असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे(The most dangerous Ice Cream in the world - Gutka Icecream; Viral Video).
गुटखा आईस्क्रीम कधी खाल्लं आहे का?
व्हायरल व्हिडिओमध्ये विक्रेता फ्युजन आईस्क्रीमची विचित्र डिश तयार करत आहे. सर्वप्रथम, तो आईस्क्रीम तव्यावर एक स्कूप क्रीम घालत आहे. त्यानंतर त्याने गुटखा मिक्स करून आईस्क्रीम गोठवून घेतली, आणि ज्यापद्धतीने रोल तयार करतात, त्यापद्धतीने आईस्क्रीम तयार केली आहे. गुटखा आईस्क्रीम तयार झाल्यानंतर, त्याने रोल्स एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यावर गुटखा पसरवून आणि चॉकलेट सिरप ओतून प्लेट सजवली आहे.
तुम्हाला लव्हेरिया नाही पण 'लव्ह ब्रेन'चा आजार नक्की असेल, पाहा ही लक्षणे.. आजार गंभीर आहे..
नेटकऱ्यांनी केलं भन्नाट ट्रोल
स्ट्रीट फूडचे असे अनेक विचित्र व्हिडीओ समोर येत असतात. त्यातच गुटखा आईस्क्रीम म्हटल्यावर नेटकऱ्यांकडून व्हिडिओला ट्रोल केलं जाणारच म्हणा. एका नेटकऱ्याने 'आईस्क्रीम खायची आहे की थुकायची?' असा प्रश्न विचारत कमेण्ट पोस्ट केली आहे. तर, दुसऱ्याने, 'का भावा, अशी आईस्क्रीम का तयार केली?' अशी कमेण्ट केली आहे. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून, अनेकांनी कमेण्ट करून व्हायरल व्हिडिओला प्रचंड ट्रोल केलं आहे.