Join us  

लेकीचा जीव वाचवण्यासाठी आईनं स्वत:चा जीव धोक्यात घातला; हे आईच करु शकते, पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2022 4:52 PM

Social Viral लेकीचा चावा घेणाऱ्या प्राण्यापासून लेकीला आणि स्वत:ला सोडवणं सोपं नव्हतं पण आईनं ते केलंच..

लहान मुलांना प्राण्यांसोबत खेळण्याची प्रचंड आवड असते. घरात पाळीव प्राणी जर असेल, तर ते त्यांच्यासह आवडीने खेळतात. कुत्रा, मांजर, असो या पक्षी ते देखील मुलांसह बागडतात. परंतु, घराच्या आवरात काही प्राणी घातक असतात. ते मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात. असाच एक प्रकार इंग्लंडमध्ये घडलाय. तेथील एका घरातील प्रवेशद्वाराजवळ रॅकूनने लहान मुलीवर हल्ला चढवला. मुलीच्या पायाला या हिंसक प्राण्याने जोरात चावा घेतला. पण तिच्या आईने हे भयानक दृष्य पाहिल्यानंतर लेकीचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून जे काही केलं ते केवळ आईच करु शकते..

एक मुलगी आपल्या घरातील दरवाजाजवळ उभी होती. काही सेकंदात रॅकून या हिंसक प्राण्याने तिच्यावर हल्ला चढवला. त्या प्राण्याने मुलीचा पाय आपल्या जबड्यात धरला. ती मुलगी वारंवार पाय झटकत होती. मात्र, रॅकून तिचा पाय सोडत नव्हता. त्यानंतर संकटात सापडलेल्या त्या मुलीच्या किंचाळ्या, घरात असलेल्या आईला ऐकू गेल्या. क्षणाचाही विलंब न लावता मुलीला वाचवण्यासाठी आईने त्या प्राण्याला  उचलले मात्र मग त्यानं आईचा हात सोडला. तो सोडता येत नव्हता. पण मग सारी ताकद पणाला लावून झटका देत त्या माउलीने त्याला लांब फेकले. आणि दोघी घरात धावल्या.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली असून, आईने दाखवलेलं धाडस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. "होल्ड माय बिअर, होली काऊ" या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या महिलेच्या या शौर्याला सोशल मीडियावर कौतुकाची थाप मिळत आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया