लहान बाळं सगळ्यांनाचं फार आवडतात. या लहान बाळांचे छोटे - छोटे हात, पाय, क्युट डोळे,गोबरे गाल वाटतं चटकन जवळ घ्यावं. पापी घ्यावी. प्रेम दाटून येतं. पण काहींना तर त्या बाळाचा चावा घ्यावा, त्याला खावं की काय असं वाटतं. चावे घेण्याची ही भयंकर इच्छा कशाने होत असेल? असं कुणी आपल्या आसपास नसेलच कशावरुन? (Ever Wanted to Squeeze a Baby? The Science Behind Cute Aggression).
यालाच म्हणतात 'क्यूट अग्रेशन' असे म्हणतात. हा Dimorphous एक्सप्रेशन्सचा एक प्रकार आहे. Dimorphous एक्सप्रेशन्स म्हणजे आपण जे काही करतोय किंवा जे काही वागतोय त्याचा बरोबर उलट भावना आपल्या मनात निर्माण होतात. जसे की आपण आतून कधी कधी खुश झालो की आपल्याला रडायला येतं, किंवा काहींना खूप राग आला की त्यांना हसायला येतं. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण काही छान बघतो तेव्हा आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाच्या भावना तयार होत असतात पण उलट भावनांमळे आपण अग्रेसिव्ह होतो(Cute aggression Why do cute things make us angry).
या भावना इतक्या प्रमाणात तयार होतात की काहीवेळा त्यांचा ओव्हरडोस देखील होतो. यामुळे एकदम एकाचवेळी एखाद्या भावनेचा ओव्हरडोस झाल्याने आपल्या मेंदूला (The Psychology Behind Why You Want To Squeeze Adorable Babies) ही गोष्ट असामान्य वाटते. मग या ओव्हरडोस झालेल्या भावनेतून बाहेर येण्यासाठी आपला मेंदू त्या भावनेच्या विरुद्ध म्हणजेच निगेटिव्ह किंवा अग्रेसिव्ह विचार किंवा इमोशन्स तयार करते. यामुळेच गोड गोंडस लहान बाळ बघून त्यांच्याविषयी अगदी जास्त प्रेम वाटते तेव्हाच या भावनेचा उलट विचार म्हणजेच त्यांना चावावेसे वाटते.
पण हे काही बरे नव्हे. असे कुणी आपल्या बाळाला चावले तर कसे वाटेल? त्यामुळे या सगळ्या प्रकाराची माहिती असणं आणि तसा काही त्रास असेल तर वैद्यकीय सल्ला घेणं हाच उत्तम उपाय आहे.