Join us  

शाळेच्या युनिफॉर्मवर रोज शाईचे डाग? मुलांना ओरडण्यापेक्षा करा २ सोप्या टिप्स, युनिफॉर्म दिसेल नव्यासारखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2024 1:32 PM

2 simple ways to remove pen stains from white school uniforms : How to Remove Ink Stains From White School Uniform : युनिफॉर्मवर मुलांनी पेन - मार्करचे डाग पाडल्याने टेंन्शन न घेता करा २ खास उपाय...

मुलांचा रोजचा शाळेचा युनिफॉर्म हा स्वच्छ व नीटनेटका असावा याची खबरदारी प्रत्येक पालक घेतात. आपल्या मुलांनी नीट स्वच्छ धुतलेला, व्यवस्थित इस्त्री केलेला युनिफॉर्म घालूंन शाळेत जावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. यासाठी पालक आपल्या मुलांच्या शाळेच्या युनिफॉर्मची स्वच्छता नेहमी करतात. पालकांनी कितीही काळजी घेतली तरीही मुलं काहीवेळा युनिफॉर्म खराब करुन येतात. मुलं लहान असल्याने किंवा काहीवेळा न कळतपणे त्यांच्याकडून युनिफॉर्मवर डाग पडतात(How to Remove Ink Stains From White School Uniform).

मुलं युनिफॉर्मवर चिखलाचे, तेलाचे, पेनाचे, मार्करचे असे वेगवेगळ्या प्रकारचे डाग पाडतात. युनिफॉर्मवरुन असे हट्टी डाग काढणे म्हणजे खूपच कठीण काम असते. अशावेळी हे हट्टी डाग काढण्यासाठी घरच्या गृहिणीला अनेक उपाय (2 simple ways to remove pen stains from white school uniforms) करुन बघावे लागतात. हे हट्टी डाग काढण्याच्या नादात आपण तो युनिफॉर्म अनेकवेळा धुतो असे केल्याने त्या कपड्यांची चमक नाहीशी होऊन, युनिफॉर्म जुना दिसू लागतो. अशावेळी नेमके काय करावे हे सुचत नाही. यासाठीच आपण २ सोप्या ट्रिक्स वापरुन मुलांच्या यूनिफॉर्मवरील पेन - मार्करचे हट्टी डाग कसे काढावेत ते पाहूयात(The Right Ways to Remove Ink Stains from From White School Uniform).

मुलांच्या शाळेच्या युनिफॉर्मवरील पेन - मार्करचे हट्टी डाग काढण्यासाठी...

१. मुलांच्या पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्मवर मुलं काहीवेळा पेन - मार्करचे डाग पाडतात अशावेळी ते स्वच्छ करण्यासाठी सोपे उपाय पाहूयात. या ट्रिकमध्ये आपण डेटॉलचा वापर करणार आहोत. डेटॉलचा वापर करुन आपण सहज सोप्या पद्धतीने पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरील पेन - मार्करचे डाग काढू शकतो. यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे डेटॉल घेऊन ते डागांवर लावून हलकेच घासून घ्यावे. त्यानंतर साबणाचा किंवा डिटर्जंटचा वापर करून नेहमीप्रमाणे हा युनिफॉर्म स्वच्छ धुवून घ्यावा. अशाप्रकारे आपण डेटॉलच्या मदतीने युनिफॉर्मवरील पेन - मार्करचे डाग लगेच काढू शकतो. 

टी बॅग्स फेकून नका - करा 'असा' वापर, स्किन ते गार्डनिंग अनेक समस्यांवर खास उपाय...

फोडणीचे तेल उडून किचनच्या टाईल्स चिकट - तेलकट होऊच  नयेत म्हणून ५ टिप्स, टाईल्स दिसतील नव्यासारख्या शुभ्र... 

२. डेटॉलप्रमाणेच आपण घरात असणाऱ्या एखाद्या परफ्युम किंवा डिओचा वापर करुन देखील हे डाग सहज काढू शकतो. यासाठी कपड्याच्या ज्या भागावर पेन - मार्करचे डाग पडले आहेत त्या भागावर परफ्युम स्प्रे करून २ ते ३ मिनिटे तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर हलक्या हाताने हा डाग घासून घ्यावा. सगळ्यात शेवटी कपडे धुण्याचा साबण किंवा डिटर्जंटचा वापर करून युनिफॉर्म पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावा.

 

अशाप्रकारे आपण मुलांच्या युनिफॉर्मवर पडलेले पेन - मार्करचे डाग डेटॉल किंवा परफ्युमचा वापर करून अगदी काही मिनिटांतच काढू शकतो.   

टॅग्स :सोशल व्हायरल