आपल्या डोळ्यासमोर असे अनेक गोष्टी असतात, त्या आपण वापरतो पण बारकाईने पाहत नाही. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे भांड्यांच्या हँडलवर असणारी छिद्रे. आपण कधी विचार केला आहे का? भांड्याच्या हँडलवर छिद्रे का असतात? त्याचा वापर स्वयंपाकघरात होतो का? हँडल आणि छिद्र्यांचा संबध काय? असे खरंतर भांड्याच्या हँडलवर छिद्रे महत्वाचे काम करतात(The Secret Reason Your Pan Handle Has a Hole).
भांड्याची उष्णता कमी करण्यासाठी होतो वापर
तवा किंवा इतर भांड्याचे तापमान साहजिक गॅसवर ठेवल्याने तापते. भांडं पकडण्यासाठी हँडल लावले जाते. हँडल देखील गरम होते, हँडल गरम होऊ नये यासाठी त्यावर छिद्रे पाडण्यात येते. छिद्रांमुळे हँडल कमी गरम होते. अशावेळी हात भाजण्याचा धोका कमी होतो. स्वयंपाक करताना हातांना इजा पोहचत नाही.
उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये उभे राहवत नाही? ५ टिप्स, किचन राहील थंड नेहमी
चमचा लटकवण्यासाठी होते मदत
स्वयंपाक भाजी किंवा डाळ परतल्यावर पळी कुठे ठेवावी असा प्रश्न पडतो. आपण वापरलेली पळी हँडलच्या छिंद्रांमध्ये लटकावून ठेऊ शकतो.
बोटात गच्च अडकलेली अंगठी निघता निघत नाही? ३ उपाय, न दुखता अंगठी निघेल सहज
पकड मजबूत करण्यासाठी
तव्यावर हाताची पकड घट्ट व्हावी यासाठी त्यात छिद्रे पाडली जातात. अनेकदा भांड्यातून पदार्थ सांडतो. तसे होऊ नये, पकड चांगली रहावी म्हणून ही छिद्रे असतात.