Join us  

दळून जास्त आलं तर पिठात अळ्या-किडे होण्याची भीती वाटते? ४ सोप्या टिप्स- पीठ टिकेल भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 3:32 PM

The Secret Trick to Getting Rid of Bugs in Flour : पिठाला जाळं लागू नयेत, अळ्या होऊ नयेत म्हणून खास टिप्स

असे अनेक पदार्थ आहे, ज्याला लवकर कीड लागते. यामध्ये पिठाचाही समावेश आहे. घरात तांदूळ, गहू किंवा ज्वारीच्या पिठाचा वापर होतोच. या पीठामध्ये बऱ्याचदा कीड लागते. खरंतर सर्वात जास्त कीड लागण्याची भीती ही रवा, डाळ आणि पिठांनाच असते. त्यामुळे स्टोअर करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

पिठाला कीड लागू नये यासाठी बरेच गृहिणी विविध उपाय करून पाहतात. मुख्य म्हणजे पीठ वापरताना सतत चाळून घ्यावे लागते. ज्यामुळे वेळ तर वाया जातोच, शिवाय आरोग्य बिघडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे पिठाला कीड लागू नये, यासाठी वेळीच ४ उपाय करून पाहा. यामुळे पीठ लवकर खराब होणार नाही, व कीड देखील लागणार नाही(The Secret Trick to Getting Rid of Bugs in Flour).

तमालपत्र

पीठ साठवताना त्यात तमालपत्र ठेवा. तमालपत्राच्या उग्र वासामुळे पिठाला कीड लागणार नाही. पीठ व्यतिरिक्त आपण तमालपत्र डाळी आणि तांदूळ इत्यादींमध्ये देखील ठेऊ शकता.

वरण किंवा डाळ खाताना अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोट हमखास बिघडते

मीठ

आपण पीठ मळताना मिठाचा वापर करतोच. जर पिठाला कीड लागू नये असे वाटत असेल तर, पीठ स्टोर करताना त्यात मीठ मिसळून ठेवा. जास्त नाही थोडेच मीठ मिसळा. या ट्रिकमुळे पिठाला कीड लागणार नाही.

कंटेनर

अनेकदा पीठ स्टोअर करताना आपली चूक होते, किंवा चुकीच्या कंटेनरमध्ये पीठ साठवून ठेवल्यास त्याला कीड लागू शकते. म्हणून पीठ साठवताना योग्य कंटेनरची निवड करा. मुख्य म्हणजे ज्याचे झाकण नीट पूणर्पणे बंद होईल, अशा कंटेनरचा वापर करा. कंटेनर नेहमी तपासून घ्या, त्यावर कोणत्याही प्रकारची छिद्रे नसतील याची खात्री करा. याशिवाय डब्यातून पीठ काढल्यानंतर डबा व्यवस्थित बंद ठेवा.

झोप कमी झाली की वजन वाढतं हे खरं की खोटं? वजन वाढत असेल तर झोपा काढा..

सुकी लाल मिरची

तमालपत्राप्रमाणे सुकी लाल मिरचीमुळे देखील पिठाला कीड लागत नाही. यासाठी पिठाच्या डब्यात एक किंवा दोन लाल सुकी मिरची ठेवा. यामुळे पिठाला कीड लागणार नाही.

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.