Lokmat Sakhi >Social Viral > बरणीच्या तळाशी गच्च बसलेला मसाला चमच्यानेही निघत नाही? १ सोपी ट्रिक, मसाला निघेल झटपट

बरणीच्या तळाशी गच्च बसलेला मसाला चमच्यानेही निघत नाही? १ सोपी ट्रिक, मसाला निघेल झटपट

The spice stuck to the bottom of the jar does not come out even with a spoon : 1 simple trick : बरणीत मसाला गच्च भरुन ठेवला की अनेकदा तळाशी घट्ट बसलेला मसाला निघत नाही, त्यासाठी हा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2023 02:56 PM2023-01-27T14:56:24+5:302023-01-27T14:59:52+5:30

The spice stuck to the bottom of the jar does not come out even with a spoon : 1 simple trick : बरणीत मसाला गच्च भरुन ठेवला की अनेकदा तळाशी घट्ट बसलेला मसाला निघत नाही, त्यासाठी हा उपाय

The spice stuck to the bottom of the jar does not come out even with a spoon? 1 simple trick, masala will be released instantly | बरणीच्या तळाशी गच्च बसलेला मसाला चमच्यानेही निघत नाही? १ सोपी ट्रिक, मसाला निघेल झटपट

बरणीच्या तळाशी गच्च बसलेला मसाला चमच्यानेही निघत नाही? १ सोपी ट्रिक, मसाला निघेल झटपट

कुठलाही खाद्यपदार्थ बनवायचा म्हंटलं की सर्वप्रथम आपण कोणते मसाले त्यात घालायचे ह्याबद्दल विचार करतो. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्याचे प्रकार असतात. किंवा प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये विविध प्रकारचे मसाले घातले जातात. कोणताही पदार्थ मसाल्यामुळे स्वादिष्ट बनतो. ह्याच मसाल्यांचे प्रमाण जर चुकीचे वापरले किंवा ते पदार्थ बनवताना कमी जास्त प्रमाणात वापरले तर तो पदार्थ स्वादिष्ट बनत नाही. हे मसाले बनवण्यासाठी प्रत्येक साहित्य हे योग्य त्या प्रमाणातच वापरावे लागते.

घरामध्ये कुठलीही भाजी बनवताना आपल्याला वेगवेगळे मसाले लागतात. ते मसाले शक्यतो कधी कुणी विकत आणतात किंवा काही घरामध्ये हे सर्व मसाले वर्षभरासाठी तयार केले जातात. वर्षभरासाठी तयार करून ठेवलेले हे मसाले आपण एखाद्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवतो. मग गरजेनुसार त्यातील थोडा थोडा मसाला काढून आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो. बऱ्याचदा हे मसाले बरणीत गच्च भरून ठेवल्यामुळे बरण्याच्या तळाशी हा मसाला अडकून राहतो. काहीवेळा चमच्याच्या मदतीनेसुद्धा हा मसाला आपण काढू शकत नाही. अशावेळी एक सोपा उपाय करून बरणीच्या तळाशी असणारा मसाला सहज काढू शकतो(The spice stuck to the bottom of the jar does not come out even with a spoon : 1 simple trick).

नक्की काय करता येऊ शकत ? 

काही वेळा आपण बरणीत भरून ठेवलेला मसाला बरणीच्या तळाशी जाऊन बरणीला चिकटून बसतो. अशावेळी हा मसाला बरणीतून काढणे अवघड होऊन बसते. आपण कितीही बरणी उलटी - सुलटी केली किंवा चमचाच्या मदतीने मसाला काढण्याचा प्रयत्न केला तरीही हा मसाला आपल्याला बरणीतून काढता येत नाही. एक सोपी पद्धत वापरून आपण बरणीच्या तळाशी चिकटलेला मसाला सहजरित्या काढू शकतो. 

बरणीच्या तळाशी गच्च बसलेला मसाला सहजरित्या काढण्यासाठीची एक सोपी ट्रिक gobblegrams या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.  

एक सोपी पद्धत...

१. ज्या बरणीच्या तळाशी मसाला अडकून बसला आहे ती बरणी उलटी करा. (बरणीचे तोंड खाली आणि खालचा बुडाचा भाग वर)
२. त्या बरणी खाली एक डिश ठेवा जेणेकरून बरणीतून सुटा करून घेतलेला मसाला त्या डिशमध्ये पडेल. 
३. आता एक दुसरी बरणी घ्या. या दुसऱ्या बरणीने ज्या बरणीच्या तळाशी मसाला अडकून बसला आहे त्याचा पृष्ठभाग घासून घ्यावा. 
४. असे करत असतानाच मसाला हळुहळु सुटा होऊन खाली डिशमध्ये पडण्यास सुरुवात होईल.    

अशाप्रकारे आपण बरणीच्या तळाशी साचून राहिलेला मसाला सहज चमच्याची मदत न घेतला काढू शकतो.

Web Title: The spice stuck to the bottom of the jar does not come out even with a spoon? 1 simple trick, masala will be released instantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.