Join us  

विद्यार्थ्याने शिक्षिकेला दिली एक ‘खास’ कॉम्प्लिमेंट, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 2:06 PM

Cute Viral Video of School Student Praising his Class Teacher : हे ऐकल्यावर ही शिक्षिका खूश झाली नसेल तरच नवल

ठळक मुद्दे९० हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ३६०० जणांनी तो लाइक केला आहे.शिक्षिका या व्हिडिओमध्ये दिसत नसली तरी तिच्या आवाजावरुन आपण तिचे भाव काय असतील याचा अंदाज नक्कीच लावू शकतो.

लहानपणी आईवडीलांनंतर मुलांसाठी शिक्षक हेच सर्वात जवळचे असतात. शिक्षक लहान मुलांना केवळ अभ्यासच शिकवत नाहीत तर इतरही अनेक गोष्टी शिकवत किंवा सांगत असतात. अनेकदा शिक्षक मुलांशी अतिशय प्रेमाने वागतात तर कधी त्यांनी दंगामस्ती केली किंवा चुकीचे वागले तर त्यांना ओरडून चांगल्या सवयीही लावतात. लहान मुलं इतकी निर्मळ असतात की त्यांच्या मनात एक बाहेर एक असं काही नसतंच. त्यांच्या मनातल्या भावना ते अतिशय मोकळेपणाने व्यक्त करत असतात. शाळेत विद्यार्थी आपल्या मित्रमंडळींबरोबरच नाही तर शिक्षकांबरोबरही अतिशय मोकळेपणाने वागतात. नुकताच असा एक व्हिडिओ समोर आला आहे (Cute Viral Video of School Student Praising his Class Teacher). 

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. तो आपल्या शिक्षिकेला तिने घातलेल्या कपड्यांवरुन अतिशय छान कॉम्प्लिमेंट देतो. हा चिमुकला आपल्या शिक्षिकेच्या जवळ येऊन तिला म्हणतो, तुम्ही साडी नेसून आल्या होत्या तेव्हा खूर छान दिसत होत्या, शिक्षिका म्हणते का छान दिसत होते? तर पुन्हा हा मुलगा म्हणतो, ती साडी तुमच्यावर खूप छान दिसत होती. इतकेच बोलून हा मुलगा थांबत नाही तर पुढे तो म्हणतो की तुम्ही माझी सगळ्यात फेवरिट टीचर आहात. शिक्षकांसाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट असल्याने हे ऐकल्यावर ही शिक्षिका खूश झाली नसेल तरच नवल.

आपल्या विद्यार्थ्याने इतक्या छान पद्धतीने आपले कौतुक करणे ही खरंच शिक्षिकेसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. शिक्षिका या व्हिडिओमध्ये दिसत नसली तरी तिच्या आवाजावरुन आपण तिचे भाव काय असतील याचा अंदाज नक्कीच लावू शकतो. संदीप पवार या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. होमवर्कपासून वाचण्याचे उपाय अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. २० सेकंदांचा हा व्हिडिओ नक्की कोणत्या शहरातील, शाळेतील आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. एका दिवसांत ९० हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ३६०० जणांनी तो लाइक केला आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालहान मुलंशाळाशिक्षक