Join us

४ चुकांमुळे वॉशिंग मशीन होऊ शकतं लवकर खराब- वीजबिलही येईल जास्त; वेळीच या चुका टाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2024 18:53 IST

The Top 4 Problems With Washing Machines And Their Solutions : वॉशिंग मशीन वर्षानुवर्ष टिकेल; फक्त ४ गोष्टी लक्षात ठेवा..

रोजच्या कामात कपडे धुणे आलंच. कपडे धुण्यासाठी आजकाल बऱ्याच लोकांकडे वॉशिंग मशीन (Washing Machine) आहेच. पण वॉशिंग मशीनचा वारंवार वापर केल्याने खराब होते (Cleaning Tips). किंवा कपडे नीट धुतले नाही जात. काही घरांमध्ये फार कमी लोक असतात, ते लोक आठवड्यातून एक किंवा दोनदा कपडे धुतात. ज्यामुळे वॉशिंग मशीनवर लोड येऊ शकते. आणि वीज बिल जास्त किंवा वॉशिंग मशीन  खराब होण्याची शक्यता जास्त असते.

जर वॉशिंग मशीन अधिक वर्ष टिकावे असं वाटत असेल तर, काही गोष्टी लक्षात ठेवा. या टिप्स लक्षात ठेऊन कपडे धुतल्याने आणि या चुका टाळल्याने वॉशिंग मशीन  अधिक वर्ष आरामात टिकेल(The Top 4 Problems With Washing Machines And Their Solutions).

एकाच वेळी कपडे धुवू नका

कपडे एकाच वेळी धुवू नका. बरीच लोक कपडे साठवून ठेवतात आणि आठवड्याच्या शेवटी कपडे धुवायला घेतात. यामुळे कपडे नीट धुतले जात नाही आणि वॉशिंग मशीनवर लोड येऊ शकतो. यामुळे वीज बिल जास्त येते आणि वॉशिंग मशीनही खराब होण्याची शक्यता वाढते.

चांदीच्या जोडव्यांची पाहा ७ ट्रेण्डी - नाजूक डिझाईन; नजरा पायांवरच खिळतील

वॉशिंग मशीन साफ करायला विसरू नका

घाणेरड्या कपड्यांमुळे वॉशिंग मशीनमध्ये वास तर पसरतो शिवाय घाणही अडकते. ज्यामुळे वॉशिंग मशीन खराब होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे आठवड्यातून एकदा वॉशिंग मशीन साफ करा.

जास्त डिटर्जंट वापरू नका

कपडे धुताना जास्त डिटर्जंटचा वापर करू नका. डिटर्जंटचा जास्त प्रमाणात वापर केल्याने जास्त प्रमाणात फेस तयार होतो. ज्यामुळे वॉशिंग मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय्य ड्रम आणि पाईप खराब होऊ शकतो.

जास्वंदाच्या झाडाला फुलंच नाही? मातीत मिसळा लसणाचे ' असे ' नैसर्गिक; कळ्या आहेत तिथे फुले फुलतील खूप

देखभालीकडे दुर्लक्ष

वॉशिंग मशीनचा व्यवस्थित वापर न झाल्यास लवकर खराब होऊ शकते. यासह पाईपची तपासणी करीत राहा. पाईप गळतीमुळे वॉशिंग मशीनमध्ये पाणी जमा होऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी पाईप स्वच्छ करत राहा.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल