Join us  

वॉशिंग मशिनमध्ये धुतलेले कपडे एकमेकांत गुंततात? फॅब्रिकही सैल होते? प्लास्टिकची पाहा कमाल - प्रश्नच सुटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2024 7:20 PM

The Use of Plastic in Washing Machine : कपडे धुताना वॉशिंग मशिनमध्ये प्लास्टिकची पिशवी टाकल्यास काय होईल?

कपडे धुण्यासाठी बहुतांश लोक वॉशिंग मशिनचा वापर करतात (Washing Machine). ज्यात कपडे झटपट धुतली जातात. पण प्रत्येक कापड वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ होईलच असे नाही (Household Tips). बऱ्याचदा काही कपड्यातून लिंट निघते. ज्यामुळे फॅब्रिक खराब होते. शिवाय कपड्यांची गुंतागुंत होते. अशावेळी आपण गोंधळून न जाता, पॉलिथिनचा वापर करू शकता.

पण आता तुम्ही म्हणाल, प्लास्टिक आणि कपड्यांचा संबंध काय? वॉशिंग मशिनमध्ये प्लास्टिक पिशवी घालताच कपडे स्वच्छ होतात का? यामुळे कपड्याचे लिंट दुसऱ्या कपड्यांना चिकटणार का? पाहूयात(The Use of Plastic in Washing Machine).

वॉशिंग मशिनमध्ये पॉलिथिन टाकल्यास काय होईल?

कपडे वॉशिंग मशिनमध्ये एकमेकांवर घासले जातात. तेव्हा फॅब्रिकचे लहान तुकडे तयार होतात, तेव्हा लिंट दुसऱ्या कपड्यांवरही चिकटतात. अशावेळी फॅब्रिक सैल होते. ज्यामुळे संपूर्ण कपड्याची शोभा कमी होते. असे होऊ नये म्हणून, आपण वॉशिंग मशिनमध्ये प्लास्टिकची एक शीट घालू शकता. यामुळे कपडे एकमेकांना घासले जाणार नाही. शिवाय एका कपड्याची लिंट दुसऱ्या कपड्यावर चिकटणार नाही.

किती आणि कधी पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात, पोट थुलथुलीत असेल तर..

वॉशिंग मशिनमध्ये पॉलिथिनचा वापर कसा करावा?

जेव्हा कपडे वॉशिंग मशिनमध्ये घालता, तेव्हा त्यात एक पॉलिथिनची जाड आणि स्वच्छ शीट त्यात घाला. यानंतर, नेहमीप्रमाणे संपूर्ण वॉश सायकल चालवा. पण जर आपण वॉशिंग मशिनमध्ये कोमट पाण्याचा वापर करत असाल तर, प्लास्टिक शीटचा वापर करू नका. कपडे धुतल्यानंतर आपल्याला दिसेल की, पॉलिथिनमध्ये लिंट जमा झालेली असेल. शिवाय कपडे व्यवस्थित क्लिन होईल.

अरे हे काय? वर्गातच स्विमिंग पूल? उन्हाचा त्रास मुलांना होऊ नये म्हणून; शिक्षकांनी लढवली शक्कल..

पॉलिथिनमध्ये लिंट कशी जमा होते?

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना पॉलिथिन घातल्याने, कपडे आणि पॉलिथिनममध्ये घर्षण होते. अशावेळी वॉशिंग मशिनमध्ये स्टेटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते. ज्यामुळे कपड्यातून निघणारे लिंट पॉलिथिनकडे आकर्षित होऊन, प्लास्टिक शीटला चिकटते. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल