Lokmat Sakhi >Social Viral > पाण्याच्या लोंढ्यात वाहून चालली तरी तिनं हातातली सेल्फी स्टिक सोडली नाही; सेल्फीचा सोस पाहून लोक म्हणाले..

पाण्याच्या लोंढ्यात वाहून चालली तरी तिनं हातातली सेल्फी स्टिक सोडली नाही; सेल्फीचा सोस पाहून लोक म्हणाले..

Woman in Flood : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अस्वस्थ झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 04:14 PM2022-07-13T16:14:07+5:302022-07-13T17:19:15+5:30

Woman in Flood : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अस्वस्थ झाले आहेत.

The woman was in the face of death due to the flood but kept taking selfies people said save your life | पाण्याच्या लोंढ्यात वाहून चालली तरी तिनं हातातली सेल्फी स्टिक सोडली नाही; सेल्फीचा सोस पाहून लोक म्हणाले..

पाण्याच्या लोंढ्यात वाहून चालली तरी तिनं हातातली सेल्फी स्टिक सोडली नाही; सेल्फीचा सोस पाहून लोक म्हणाले..

सोशल मीडियाचा वापर आजकाल प्रत्येकजण करतो. लोकांना प्रत्येक क्षण कॅमेरात कैद करायचा असतो. सेल्फी घेत, सोशल मीडिया वापरकर्ते ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. सेल्फीच्या नादात लोकांना जीव गमवावा लागल्याचे अनेकवेळा घडले आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पुराच्या वेळी सेल्फी घेताना दिसत आहे. पूर्णपणे पाण्यात बुडूनही ती सेल्फी घेणे सोडत नाहीये. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अस्वस्थ झाले आहेत. (The woman was in the face of death due to the flood but kept taking selfies people said save your life)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला सेल्फीसाठी कसा जीव द्यायला तयार आहे हे पाहायला मिळत आहे. पुराचे पाणी येऊनही ती सेल्फी काढणं थांबवत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स महिलेला फटकारत आहेत.

'रिकामा डबा पाठवला तरी चालेल'! मेसमध्ये जेवणाऱ्या लेकीच्या मैत्रिणीला एका आईनं लिहिलेलं मायेचं पत्र

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @TheFigen नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर या व्हिडिओवर अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक यूजर पूर्णपणे संतापला. तो म्हणाला - जीवन महत्वाचे आहे. सेल्फी कधीही घेता येतो. आजकाल अनेक अशा घटना समोर येतात ज्यामध्ये मोबाईलच्या मागे वेडे झालेले लोक स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. 

Web Title: The woman was in the face of death due to the flood but kept taking selfies people said save your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.