Lokmat Sakhi >Social Viral > जगातली सगळ्यात उंच तरुणी, उंची इतकी की पहिल्यांदा विमानात बसायचं तर... पहा तिची इंटरेस्टिंग गोष्ट 

जगातली सगळ्यात उंच तरुणी, उंची इतकी की पहिल्यांदा विमानात बसायचं तर... पहा तिची इंटरेस्टिंग गोष्ट 

World’s Tallest Woman: रुमेयसा गेल्गी या जगातल्या सगळ्या उंच तरुणीने तिच्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा केलेला विमान प्रवास (flight journey) खरोखरच आगळावेगळा होता. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 02:51 PM2022-11-05T14:51:14+5:302022-11-05T14:51:51+5:30

World’s Tallest Woman: रुमेयसा गेल्गी या जगातल्या सगळ्या उंच तरुणीने तिच्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा केलेला विमान प्रवास (flight journey) खरोखरच आगळावेगळा होता. 

The world’s tallest woman Rumeysa Gelgi's first flight journey was very interesting | जगातली सगळ्यात उंच तरुणी, उंची इतकी की पहिल्यांदा विमानात बसायचं तर... पहा तिची इंटरेस्टिंग गोष्ट 

जगातली सगळ्यात उंच तरुणी, उंची इतकी की पहिल्यांदा विमानात बसायचं तर... पहा तिची इंटरेस्टिंग गोष्ट 

Highlightsतिचा तुर्की ते सेन फ्रान्सिस्को हा विमान प्रवास सुखरुप व्हावा, यासाठी विमान कंपनीला आणि त्यांच्या स्टाफलाही बरीच मेहनत घ्यावी लागली होती. 

मुळची तुर्कीची असणारी रुमेयसा गेल्गी (Rumeysa Gelgi from Turkey), तिची ७ फूटाची उंची आणि त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे घेतली गेलेली नोंद (The world’s tallest woman) तसेच आता सध्या तिने केलेला तिच्या आयुष्यातील पहिलाच विमान प्रवास (first flight journey) या सगळ्या गोष्टी सध्या प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. कोण ही रुमेयसा हे जाणून घेण्यासाठी बरेच जण उत्सूक असून गुगलवर तिच्याविषयीची बरीच माहितीही सर्च करण्यात येत आहे. तिचा तुर्की ते सेन फ्रान्सिस्को हा विमान प्रवास सुखरुप व्हावा, यासाठी विमान कंपनीला आणि त्यांच्या स्टाफलाही बरीच मेहनत घ्यावी लागली होती. 

 

कोण आहे रुमेयसा?
जगातली सगळ्यात उंच टीनएजर म्हणून रुमेयसाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २०१४ साली नोंद झाली होती. त्यानंतर २०२१ साली तिची जगातली सगळ्यात उंच महिला म्हणून नोंद घेण्यात आली. ७ फूट ७ इंच एवढी उंची असणाऱ्या रुमेयसाला जन्मजातच Weaver syndrome हा आजार आहे.

झटपट कमी होतं ते वजन असतं की शरीरावरची सूज? तज्ज्ञ सांगतात, वजन घटवताना काय माहिती हवंच..

यामुळे तिची वाढ खूप वेगात होते. हेच तिच्या उंचीचे कारण आहे. याशिवाय या आजारामुळे स्नायूंची आणि जॉईंट्स हालचाल मर्यादित असणे, चालताना अडचणी येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, शरीरावर सूज येणे, असे अनेक त्रासही तिला होतात. त्यामुळे ती अधिकाधिक वेळ व्हिलचेअरवरच असते. या आजाराविषयी ती म्हणते की मला माहिती आहे मी सगळ्यापेक्षा वेगळी आहे. पण त्यामुळे दु:खी न होता आजारामुळे मिळालेला हा युनिकनेस मला प्रत्येकवेळी नव्या पद्धतीने सेलिब्रेट करायला आवडते. 


 
कसा झाला तिचा विमान प्रवास?
रुमेयसा एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत आहे. कामानिमित्त तिने नुकताच तुर्की ते सेन फ्रान्सिस्को असा विमान प्रवास केला. आता ती पुढील ६ महिने सेन फ्रान्सिस्कोला असणार आहे.

लेकीचा आदेश म्हणून तिच्या बाहुलीच्या कपड्यांना इस्त्री करत बसला बाबा.. प्रेमळ बाबाचा व्हायरल व्हिडिओ

या प्रवासात तिला त्रास होऊ नाही म्हणून तुर्की एअरलाईन्सनी तिच्या विमानात खास बदल करून घेतला होता. विमानाची ६ आसनं काढून टाकली होती आणि तिथे रुमेयसासाठी एक स्ट्रेचर तयार केलं होतं. जेणेकरून ती झोपून तिचा प्रवास आरामात पुर्ण करू शकेल. या सगळ्या सुविधांबाबत तिने सोशल मिडियाद्वारे तुर्की एअरलाईन्सचे आभारही मानले आहेत.  
 

Web Title: The world’s tallest woman Rumeysa Gelgi's first flight journey was very interesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.