ज्यावेळी खूप भूक लागलेली असते आणि खायला काहीच नसतं किंवा काही अन्नपदार्थ विकत घ्यायलाही पैसे नसतात यापेक्षा वाईट दुसरं काहीच नसू शकतं. कितीतरी लोकांना पोट भरण्यापूरताही पैसे मिळत नाहीत. पण नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं... सोशल मीडियावर अशीच एक आश्चर्यकारक घटना व्हायरल होत आहे. केरळच्या या घटनेनं सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. (There was no money to feed the hungry children helpless mother suddenly got 50 lakhs in donation)
माणूसकी अजूनही शिल्लक आहे यावर तुमचा विश्वास बसेल असंच काहीसं या घटनेत घडलंय. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला पूर्णपणे खचली होती. आर्थिक स्थिती इतकी खराब होती की घरात खायला काहीच नसायचं. त्यामुळे सुभद्रा नावच्या या महिलेला आपल्या मुलांचं पोट कसं भरायचं याचीच चिंता असायची. बिकट परिस्थितीमुळे मुलांना उपाशी झोपताना पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय तिच्यापुढे नव्हता.
देने वाला जब भी देता छप्पर फाड के....
कधी कधी देव कोणत्या रूपात आपली मदत करेल काहीच सांगता येत नाही. असंच काहीसं सुभद्राच्या आयुष्यात घडलं तिनं आपली परिस्थिती मुलाच्या वर्गशिक्षिका गिरिजा हरिकुमार यांना सांगितली. यानंतर गिरीजा यांनी सुभद्राला एक हजार रुपये दिले आणि काही दिवस पुरेल इतक्या अन्नाची व्यवस्था केली. नंतर तिच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे यायला सुरूवात झाली सुरूवातीला हे पैसे कोण पाठवतंय हे कळलंच नाही.
नेमका हा प्रकार आहे काय?
सुभद्राला गिरीजा यांच्याकडून हजार रुपये मिळाल्यानंतर गिरिजा यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यात सुभद्राच्या परिस्थितीचा उल्लेख केला. खरंतर त्यावेळी सुभद्राच्या घरात अन्नाचा एक कणही नव्हता. गिरीजा यांनी हे पाहिल्यानंतर त्या भावूक होऊन घरी परतल्या. त्यांना सुभद्राची मदत करायची होती पण कशी मदत करावी हेच कळत नव्हतं. अशावेळी एक फेसबुक पोस्ट केल्यानं मदतीचा महापूर आला अन् सुभद्राला चांगले दिवस आले.
या पोस्टमध्ये गिरीजा यांचा अकाऊंटनंबरसुद्धा दिला होता. पोस्टनुसार सुभद्राच्या अकाऊंटमध्ये अनोळखी व्यक्तीनं हे पैसे टाकले होते. शिक्षिकेची पोस्ट जसजशी व्हायरल होत गेली तसतसं तिच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले. एकेकाळी घरात लेकरांना खाण्यासाठी एक दाणाही नव्हता त्याच महिलेच्या अकाऊंटमध्ये जवळपास ५५ लाख रूपये जमा झाले. शिक्षिकेद्वारे चालवण्यात आलेल्या क्राउड फंडिंग द्वारे रातोरात या महिलेचं आयुष्य बदललं.